Sunday, July 14, 2024

…अन्यथा आयोगाविरोधात कोर्ट मध्ये जावू- देवेंद्र फडणवीस

- Advertisement -

सोमवारपासून पुण्यातील बालगंधर्व चौकात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. मागण्या पूर्ण केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही या निर्णयावर विद्यार्थी ठाम आहेत. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून परिक्षेचा नवीन पॅटर्न २०२५ पासून लागू करण्यात आला. पण हा निर्णय सहजासहजी लागू झाला नाही. याकरिता विद्यार्थ्यांना अभ्यास सोडून रस्त्याची लढाई लढावी लागली होती. ठिय्या करावा लागला होता. आता विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर उतरले आहेत. अशात या विद्यार्थ्यांबरोबर काँग्रेसचे काही कार्यकर्ते देखील आमरण उपोषण करत आहेत. यावर सरकार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

पुण्यात चालू असलेल्या mpsc च्या आंदोलनाला युवसेनेचा पाठिंबा

mpsc protest | या विद्यार्थ्याने घेतला आमरण उपोषणाचा निर्णय…

आंदोलन चालू असताना भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना कॉल करून सरकारचे म्हणणे विद्यार्थ्याना ऐकवले. विद्यार्थ्यांशी बोलताना फडणवीस यांनी सांगितले की सरकार विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहे. पण mpsc आयोग स्वायत असल्यामुळे हा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. त्यामुळे जर आयोगाने योग्य निर्णय घेतला नाही तर सरकार आयोगाविरोधात कोर्ट मध्ये जाईल त्यामुळे विद्यार्थ्याच्या पाठीशी हे सरकार आहे. यावेळी कॉँग्रेसचे नेते अतुल लोंढेही उपस्थित होते.

मी स्वत: एमपीएससी प्रमुखांशी बोललो आणि समजावून सांगितल. MPSC चा जो अभ्यासक्रम आहे ऑब्जेक्टीव आणि डिस्क्रीप्टीव हे दोन्ही बदलण्यास आमची हरकत नाही. मात्र विद्यार्थ्यांचं म्हणणं आम्हाला मान्य आहे. जो बदल करायचा आहे तो साल २०२५ पासून करण्यात यावा. आम्ही यासाठी सर्व विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहोत. याआधीही आम्ही विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी काम केली आणि आता देखील आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

काल माजी मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी पुण्यात विद्यार्थ्यांची भेट घेतली तसेचस मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत मोठं विधान केलं आहे. ‘सरकारने या अगोदर विद्यार्थ्यांना आश्वासन दिले होते. मात्र, त्याची पूर्तता झाली नाही. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विनंतीनंतर आश्वासन नको अंमलबजावणी हवी. मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतर काय निर्णय होणार याबाबत संभ्रम आहे. त्यामुळे निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरू राहणार, असं बाळासाहेब थोरातांनी म्हटलं आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles