पुलाची शिरोलीत सतेज गटाला दे धक्का देऊन महाडीक गटाच्या पद्मजा करपे विजयी

कोल्हापूर : सत्ताधारी शाहू स्वाभिमानी आघाडी अर्थात सतेज पाटील गटाच्या उमेदवार रूपाली खवरे यांचा पराभव करून महाडीक गटाच्या पद्मजा करपे या विजयी झाल्या आहेत. महाडीक परिवारावर विश्वास ठेवून जिल्हामध्ये विविध ग्रामपंचायतीमध्ये सत्ता स्थापन झाली आहे. पूलाची शिरोलीमध्ये विकासाच्या नव्या पर्वाला सुरुवात होत आहे. अशी भावना महाडीक गटाची आहे. यामध्ये पद्मजा करपे यांनी चार हजारहून अधिक मताधिक्य घेत आपल्या सोबत सतरापैकी सोळा जागा निवडून आणल्या आहेत. या विजयात मा. आमदार महादेवराव महाडीक, गौकुळच्या संचालिका शौमिका महाडीक यांचा सिंहाचा वाटा आहे. या पराभवाने सतेज पाटील गटाला मोठा धक्का बसला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here