Friday, September 13, 2024

pm kisan | मोठी बातमी, ‘या’ दिवशी जमा होणार १३ व्या हप्त्याची रक्कम

- Advertisement -

पंतप्रधान किसान pm kisan योजनेचा तेरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर या आठवड्यात येऊ शकते असे संकेत सरकारकडून देण्यात आले आहेत. देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन ही योजना राबवण्यात आली आहे. या योजनेशी संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर दरवर्षी 6,000 रुपये डीबीटीद्वारे वर्ग केले जात आहेत. आत्तापर्यंत शेतकऱ्यांना 12 हप्त्यांमध्ये 2,000 रुपये ट्रान्सफर मिळाले असून शेतकरी 13 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.  देशातील आठ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवले जातील. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

किसान सन्मान निधी योजनेत गेल्या वर्षी १ जानेवारी २०२२ रोजी खात्यात पैसे आले होते. ती तारीख यंदा उलटली त्यामुळे शेतकऱयांनी याबाबत विचारणा सुरू केली आहे. पीएम किसान pm kisan योजनेशी संबंधित प्रत्येक लाभार्थी शेतकरी बांधव 13 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. २ कोटींहून अधिक शेतकरी अपात्र किंवा त्यांचे ई-केवायसी कार्ड अपडेट करण्यात अपयशी ठरल्याचे आढळल्याने त्याना तो हप्ता पाठविण्यात आलेला नाही. या योजनेच्या माध्यमातून देशातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. नवीन वर्षात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान योजनेचे पैसे जमा होऊ शकतात. हे पैसे खात्यावर जमा होण्यासाठी शेतकऱ्यांना काही गोष्टींची पूर्तता करवी लागणार आहे. 

Pradhan Mantri Awas Yojana|प्रधानमंत्री आवास योजना

maharashtra kesari | पुण्यात होणार महाराष्ट्र केसरीचा थरार

PM Kisan Yojana : जमिनीच्या नोंदी तपासा 

तुम्ही जर अद्याप जमिनीच्या नोंदींची पडताळणी केली नसेल तर ते काम लवकर पूर्ण करून घ्या. जमिनीच्या नोंदीची पडताळणी केली नाही तर तुम्ही पीएम किसान योजनेच्या 13 व्या हप्त्याच्या लाभापासून वंचित राहू शकता. त्यामुळेच तुमच्या जवळच्या कृषी कार्यालयात जाऊन हे काम पूर्ण करून घ्या.

नाव पहाण्यासाठी येथे क्लिक करा pm kisan status

या योजनेत ज्या लोकांनी आतापर्यंत फसव्या पद्धतीने लाभ घेतला आहे. या लोकांची नावे त्या-त्या राज्यांनी जाहीर केली आहेत. आता त्या लोकांकडून पैसे परत घेतले जात आहेत. यावेळी त्यांच्या खात्यात पैसे येणार नाहीत. तसेच मागील हप्त्याचे पैसे त्यांना सरकारला परत करावे लागणार आहेत. या योजनेचा फसव्या मार्गाने लाभ घेणारे अनेकजण होते. याला आळा घालण्यासाठी शासनाने जमिनीच्या नोंदींची पडताळणी करणे बंधनकारक केले आहे.  

PM Kisan Yojana : ई-केवायसी करणे आवश्यक आहे 

तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्ही ई-केवायसी केली पाहिजे. असे न केल्यास 13 व्या हप्त्याचे पैसे अडकू शकतात. प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्याला ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तुम्ही pmkisan.gov.in या वेबसाईटला भेट देऊन किंवा तुमच्या जवळच्या CSC केंद्राला भेट देऊन ई-केवायसी करू शकता.

असा करा अर्ज

या योजनेतील पात्र शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर जावे लागेल. तेथे खालच्या बाजूला ‘किसान किंवा फार्मर्स कॉर्नर’ दिसेल. येथे लाभार्थी यादीतील नाव तपासणे शक्य आहे.. भू -लेख पडताळणी, आधार अपडेट, ई-केवायसी आणि इतर अपडेट पूर्ण झाल्यानंतरच केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात निधी पाठवते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles