pm kisan samman nidhi सन्मान निधी या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वकांशी योजनेतून सामान्य शेतकरी यांना वार्षिक ६ हजार रुपयांचे अर्थसहाय्य तीन हप्त्यांमध्ये जमा होते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढील गोष्टी आवश्यक आहेत. पीएम किसान योजनेशी संबंधित प्रत्येक लाभार्थी शेतकरी बांधव 13 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. या योजनेच्या माध्यमातून देशातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
आवश्यक कागदपत्रे :-
- शेतजमिनीचा ७/१२ अर्जदाराच्या नावाचा असावा.
- आधारकार्ड
- मतदार ओळखपत्र
- बँक खाते पासबूक
- पासपोर्ट साइज फोटो
- पॅनकार्ड
- मोबाइल नंबर आधारशी लिंक असावा.
या योजनेत अर्ज करण्यासाठी संबंधित ग्रामपंचायत, तहसीलदर कार्यालय किंवा csc (कॉमन सर्विस सेंटर) मध्ये अर्ज करता येईल. अथवा ऑनलाइन अर्ज करता येईल.
जर तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर ई-केवायसी करा. त्यामुळेही पैसे अडकू शकतात. तुम्ही http://pmkisan.gov.in ला भेट देऊन किंवा तुमच्या जवळच्या CSC केंद्राला भेट देऊन ऑनलाइन करू शकता.
तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्ही ई-केवायसी केली पाहिजे. असे न केल्यास 13 व्या हप्त्याचे पैसे अडकू शकतात. प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्याला ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तुम्ही pmkisan.gov.in या वेबसाईटला भेट देऊन किंवा तुमच्या जवळच्या CSC केंद्राला भेट देऊन ई-केवायसी करू शकता.
शेतकर्यांनी या योजनेचा अखंड E-KYC करणे आनिर्वाय आहे.
Pradhan Mantri Awas Yojana|प्रधानमंत्री आवास योजना
maharashtra kesari | पुण्यात होणार महाराष्ट्र केसरीचा थरार
PM Kisan Yojana : अशी करा ऑनलाइन ई-केवायसी
आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांनी आपला आधार क्रमांक बँकेशी लिंक केलेला नाही. यामुळेच हजारो शेतकऱ्यांचे पैसे अजूनही अडकले आहेत. ही प्रक्रिया खूप सोपी आहे. pm kisan samman nidhi
सर्वप्रथम pmkisan.gov.in वर जा.
होम पेजवर फार्मर्स कॉर्नरच्या विभागात e-KYC चा पर्याय निवडा.
नवीन पेज उघडताच आधार कार्ड क्रमांक टाका.
आता शेतकऱ्याच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ओटीपी पाठवला जाईल.
साइटवर ओटीपी प्रविष्ट करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने ई-केवायसी करून घ्या.