खा. धनंजय महाडीक यांची हिराबेन मोदी यांना श्रद्धांजली!

हिराबेन मोदी

कोल्हापूर : देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचे पहाटे निधन झाले. त्या १०० वर्षाच्या होत्या. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जडणघडणीत त्यांचे बहुमोल योगदान होते. “पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी अनंतात विलीन झाल्याची बातमी अतीव दु:खद आहे. एक तपस्विनी, निष्काम कर्मयोग्याचं प्रतीक, मूल्याधिष्टित आयुष्य जगून भारतमातेच्या सेवेकरिता ओजस्वी पुत्र घडविण्याला मातेला भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो!” अशा शब्दात भाजपचे प्रदेश प्रवक्ते खा. धनंजय महाडीक श्रद्धांजली वाहिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here