महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील लाखो विद्यार्थी पोलीस भरतीसाठी प्रयत्न करतात. या परीक्षेत उत्तीर्ण होऊन महाराष्ट्र पोलीस दलात काम करण्याची अनेकांची इच्छा असते. त्यामुळे लाखो विद्यार्थी परीक्षेसाठी अर्ज करतात. यापैकी काहींचे पोलीस होण्याचं स्वप्न पूर्ण होतं. तर काही तरुण पुन्हा नव्या जोमाने पोलीस भरतीच्या तयारीला लागतात. परंतु आलीकडच्या काळात काही जण गैरप्रकाराचा अवलंब करत आहेत. अशातच मुंबई पोलीस भरती Police bharti परीक्षेत हायटेक कॉपी प्रकरण समोर आले होते. आता या प्रकरणी पाचवा गुन्हा दाखल झाला आहे.
मुंबई पोलीस दलातर्फे शारीरिक चाचणीनंतर दिनांक ०७ मे २०२३ रोजी एकूण ७,०७६ जागांसाठी २१३ केंद्रांवर पोलीस शिपाई पदाची लेखी परीक्षा घेण्यात आली होती. एकूण ७८,५२२ उमेदवारांनी परीक्षा दिली तर परीक्षेच्या बंदोबस्तासाठी १२४६ पोलीस अधिकारी व ५,९७५ पोलीस अंमलदार यांची नियुक्ती करण्यात आली होती. पण या लेखी परीक्षेचा पेपर परीक्षेदरम्यान फुटल्याचे पुरावे स्पर्धा परीक्षा समन्वय समिती समोर आले होते. mumbai Police bharti
Kolhapur | कोल्हापुरातील ‘या’ गावात खरंच सोन्याचा पाऊस पडतो?
नेमकी कश्या पद्धतीने हायटेक कॉपी केली जाते…
संभाजीनगर-जालना-बीड या तीन जिल्ह्यांमध्ये हाय-टेक उपकरणे उदा. शेंगदाण्याच्या आकाराइतके लहान ब्लूटूथ, प्रति दोन-तीन सेकंदाला ऑटोमॅटिकली फोटो कैप्चर करणार सुक्ष्म बटण कॅमेरा वापरून परीक्षेदरम्यान प्रश्नपत्रिका फोडणाऱ्या अनेक टोळ्या आहेत. या टोळ्या प्रश्नपत्रिका सेंटर बाहेर पाठवून प्रश्नांची उत्तरे एक्स्पर्ट कडून सोडवून घेतात, व त्या प्रश्नांची उत्तरे परीक्षेला बसलेल्या उमेदवाराला ब्लूटूथच्या माध्यमाने सांगितली जातात. Police bharti
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती यांच्या आरोपानंतर मुंबई पोलीस भरती परीक्षेत हायटेक कॉपी प्रकरण समोर आणल्यानंतर या सगळ्या प्रकरणांमध्ये दहिसर पोलीस ठाणे येथे पाचवा गुन्हा दाखल झाला आहे. ७ मे रोजी मुंबई पोलीस भरती लेखी परीक्षा पार पडली आणि याच लेखी परीक्षेत बटन कॅमेरा आणि मायक्रो ब्ल्यूटूथ चा वापर करून उमेदवारांनी कॉपी केल्याचे प्रकरण समोर आलं होतं. परीक्षा नंतर झालेला गैरप्रकार समोर आल्यानंतर मुंबईत चार ठिकाणी गुन्हे दाखल झाले होते. आता स्पर्धा परीक्षा समन्वय समितीकडून मुंबई पोलिसांना देण्यात आलेल्या पुराव्यानंतर दहिसर पोलीस ठाण्यात पाचवा गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये संबंधित उमेदवार आणि त्याच्या साथीदारावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील चार उपायुक्त या सगळ्या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. mumbai police bharati
काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी उमेदवारांकडून 10 ते 12 लाख घेतले जात असल्याचा दावा केला आहे. पोलीस दलात झालेल्या भरती प्रक्रियेतील गैरप्रकारांची विशेष चौकशी पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करण्याची मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पोलीस महासंचालकांकडे केलेली आहे.
MPSC समन्वय समितीने आत्तापर्यंत उघड केलेल घोटाळे…
“महापरिक्षा पोर्टल” आंदोलन काळात स्थापन केलेल्या “MPSC समन्वय समितीचा” विस्तार पुढील काळात “स्पर्धा परीक्षा समन्वय समिती” असा झाला. महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षेतील भ्रष्टाचार समोर आणून विद्यार्थांच्या सर्व समस्या सोडविणे तसेच प्रामाणिक उमेदवारांना निर्भिड व अराजकीय व्यासपीठ उपलब्ध करून देणे आमचे प्रमुख कार्य आहे. गेल्या वर्षी संघटना अधिकृतरीत्या नोंदणीकृत केली असून ४२०/२०२२(बी) असा नोंदणी क्रमांक आहे, संघटनेच्या शाखा राज्यभरातील २१ जिल्ह्यात असून प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाध्यक्षांच्या अधिपत्याखाली स्वतंत्र टीम कार्यरत आहेत. महापरीक्षा पोर्टल घोटाळा, आरोग्य भरती घोटाळा, म्हाडा भरती पेपरफुटी, TET घोटाळा, MIDC भरती घोटाळा इत्यादी राज्यातील सर्वात मोठे नोकर भरती घोटाळे आम्ही उघड करून अनेक पोलीस स्थानकांत अधिकृत तक्रार दिली आहे. कोणत्याही राजकीय पक्षाशी बांधील नसणे, कोणत्याही पक्षाच्या दबावाला न झुगारता, आपली अराजकिय प्रतिमा कायम ठेवत पारदर्शक नोकरभरती करिता प्रयत्न करणे, अशी संघटनेची कायम ओळख राहिली आहे. mumbai police bharati