Friday, July 26, 2024

प्रधानमंत्री आवास योजना (PMAY)

- Advertisement -

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 25 जून 2015 रोजी प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) सुरू केली. या योजनेचा
उद्देश बेघर, कच्ची घरे आणि दारिद्र्यरेषेखालील झोपडपट्टीत राहणार्‍या कुटुंबांना स्वतःची पक्की घरे
उपलब्ध करून देणे हा आहे. देशातील प्रत्येकाला घर उपलब्ध करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. ही योजना
शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागांसाठी लागू आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेचे प्रामुख्याने दोन भागात विधान केले आहे | The Prime Minister’s Housing Scheme has been divided into two parts

  1. प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) शहरी
  2. प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) ग्रामीण

प्रधानमंत्री आवास योजनेचे उद्दिष्टे | Objective of the Prime Minister’s Housing Scheme

सन 2023 पर्यंत ज्या नागरिकांकडे स्वतःचे हक्काचे घर नाही अशा सर्व नागरिकांना घरे उपलब्ध करून देणे हे प्रधानमंत्री आवास योजनेचे (PMAY) मुख्य उद्दिष्ट आहे,

आपल्या देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोक ज्यांना स्वतःचे पक्के घर बांधायचे आहे परंतु आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने ते बनवू शकत नाहीत, अशा दुर्बल घटकांना स्वत:चे पक्के घर बांधण्यासाठी भारत सरकारकडून आर्थिक मदत देणे आणि गरिबांचे स्वप्न साकार करणे, हे प्रधानमंत्री आवास योजनेचे उद्दिष्ट आहे. यासोबतच पक्की शौचालये बनवण्यासाठी 12 हजार रुपयांची मदतही दिली जाणार आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी लाभार्थी पात्रता | Eligibility for Beneficiaries under the Prime Minister’s Housing Scheme

कौटुंबिक स्थिती :- या योजनेंतर्गत लाभांसाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थीकडे भारताच्या कोणत्याही भागात,
त्याच्या नावावर किंवा त्याच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर पक्के घर नसावे.
घराची मालकी :- २१ चौरस मीटरपेक्षा कमी पक्के घर असलेल्या लोकांना सध्याच्या घराच्या वाढीमध्ये
समाविष्ट केले जाऊ शकते.
वैवाहिक स्थिती :- विवाहित जोडप्यांच्या बाबतीत, पती-पत्नीपैकी एक किंवा दोघेही एकत्रित
मालकीमध्ये, एकाच घरासाठी पात्र असतील, जर त्यांनी योजने अंतर्गत कुटुंबाच्या उत्पन्नाच्या पात्रतेच्या
निकषांची पूर्तता केली असेल.

प्रधानमंत्री आवास योजना आवश्यक घटक | Key Components of the Prime Minister’s Housing Scheme

  • झोपडपट्टी धारकांसाठी खाजगी सहभागातून घरे बांधून झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करणे.
  • घरकुल बांधकामाकरिता साधारण क्षेत्रात रू. १.२० लाख व नक्षलग्रस्त भागाकरिता रू.१.३० लाख प्रति लाभार्थी अर्थसहाय देण्यात येणार आहे.
  • भागीदारीत परवडणारी घरे राज्ये केंद्रीय एजन्सीमार्फत किंवा ईडब्ल्यूएस श्रेणीसाठी खाजगी क्षेत्राच्या भागीदारीतून, १.५० लाख रुपयांच्या केंद्रीय सहाय्याने गृहनिर्माण प्रकल्प उभे राहतील.
  • लाभार्थ्यांच्या नेतृत्वाखालील वैयक्तिक घर बांधणी/सुधारणा (BLC) ईडब्ल्यूएस श्रेणीतील लोक एकतर नवीन घर बांधू शकतात किंवा १.५० लाख रुपये केंद्रीय सहाय्याने स्वतःचे घर वाढवू शकतात अशी तरतूद करते.

प्रधानमंत्री आवास योजना आवश्यक कागदपत्रे | Essential Documents for the Prime Minister’s Housing Scheme

  • आधार कार्ड
  • पत्त्याचा पुरावा
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • ओळखपत्र
  • जात प्रमाणपत्र
  • मतदार ओळखपत्र
  • योजनेचा अर्ज
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • मोबाईल नंबर
  • बँक खाते क्रमांक (तुमचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असावे)

प्रधानमंत्री आवास योजनेत अर्ज कसा करावा | How to apply for the Prime Minister’s Housing Scheme

ऑनलाइन अर्ज कसा करावा

  1. प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या शहरी :- https://pmaymis.gov.in/ ग्रामीण :- https://www.myscheme.gov.in/schemes/pmay-g
  2. “ऑनलाइन अर्ज करा” या पर्यायावर क्लिक करा.
  3. तुमचे वैयक्तिक तपशील, उत्पन्नाचे पुरावे, मालमत्ताचे पुरावे आणि इतर आवश्यक कागदपत्रे भरून फॉर्म सबमिट करा.
  4. तुमचा अर्ज जमा केल्यानंतर, तुम्हाला एक अर्ज क्रमांक मिळेल.
  5. तुमच्या अर्जाची स्थिती तपासण्यासाठी, तुम्ही तुमचा अर्ज क्रमांक आणि आधार क्रमांक वापरून PMAY वेबसाइटवर लॉग इन करू शकता.

ऑफलाइन अर्ज कसा करावा

  1. तुमच्या स्थानिक प्रधानमंत्री आवास योजना कार्यालयाला भेट द्या.
  2. प्रधानमंत्री आवास योजना (PMAY)अर्ज फॉर्म आणि आवश्यक कागदपत्रे घ्या.
  3. फॉर्म पूर्ण करा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा.
  4. फॉर्म आणि कागदपत्रे प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) कार्यालयात जमा करा.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles