Monday, September 9, 2024

mahaIT ; पुणे स्टेट बोर्ड क्लर्क परीक्षेत घोटाळेबाजांचा सुळ सुळसुळाट, मंत्र्यांचे दुर्लक्ष ?

- Advertisement -

आज स्टेट बोर्ड क्लर्क परीक्षेचा निकाल लागला. डिसेंबर 2019 मध्ये झालेल्या या परीक्षेबाबत तेंव्हापासूनच विरोध होत होता. याला कारणही तत्कालीन महापरीक्षा पोर्टल आहे. महाआयटी ने घेतलेल्या परीक्षा पैकी हा शेवटचा निकाल आहे.आणि नक्कीच हा निकाल बघून आणखी शंभर “स्वप्नील लोणकर” आत्महत्या करतील यात तिळमात्र शंका नाही.

या निकालाने परत एकदा सिद्ध करून दिले की, सरकार कुठल्याही पक्षाचा असो आम्ही पारदर्शक भरती होऊ देणार नाही कारण आम्ही आमच्या निवडणूक लढवायला पैसे आणायचे कुठून. महाआयटी ने घेतलेल्या सर्व परीक्षांचे निकाल एकदा जरी डोळ्याखालून घातले तर सरळ सरळ दिसून येते की फक्त आणि फक्त VJ A (विजा अ) प्रवर्गातील उमेदवार हे ओपन कॅटेगिरी मधून सर्वोच्च गुणाने अंतिम निवड यादीत टॉपर आहेत. मग तो निकाल तलाठी असो वा वन रक्षक भरती असो किंवा आत्ताच लागलेला बोर्डाचा निकाल असो. आणि महाराष्ट्रात सर्वात जास्त यातून कोणाचे नुकसान होत असेल तर ते मराठा म्हणजेच तेव्हाचे SEBC आणि आताचे EWS उमेदवार आहेत. या अन्यायाविरुद्ध आवाज उठवूनही काही फायदा झाला नाही. सरकार दरबारी खेटे घालून न्याय मिळत नसल्यामुळे शेवटी कोर्टाचे दरवाजे ठोठावणे शिवाय एमपीएससी समन्वय समिती कडे दुसरा कुठलाही पर्याय राहिलेला नाही. अशी प्रतिक्रिया वैजनाथ यांनी दिली.
20 जानेवारी 2020 रोजी mpsc समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री सतेज पाटील तसेच महापरिक्षा पोर्टल चे अधिकारी आणि IAS मदन नागरगोजे व सत्यजित तांबे यांची महापरिक्षा पोर्टल बाबत बैठक झाली होती. त्यात आम्ही राज्यमंत्री सतेज पाटील यांना महापरिक्षा पोर्टल बाबत सर्व पुरावे दिले, खास करून ssc बोर्ड कनिष्ठ लिपिक या पदाचे. यात कसा भ्रष्टाचार झाला आहे. 200 पैकी 194 मार्क पाडणे किती अवघड असताना मुलांनी 194 मार्क पाडले, पाडले ठीक आहे पण यांची चुकलेली प्रश्न सारखीच आणि चुकीचा पर्याय निवडला आहे तो पण सारखाच. तसेच mpsc ने ब्लॅकलिस्ट केलेले पोरांनी सुद्धा 194 मार्क पाडले. असे खूप विद्यार्थी आहेत हे सर्व आम्ही त्यांना दाखवले त्यांनी मान्य पण केला की घोळ झाला आहे. आम्ही चौकशी करू पण कसलीच चौकशी केली नाही. उलट त्यांची निवड केली. यावरून सिद्ध होत आहे की हे पण यात सामील आहेत.
राहुल कवठेकर , एमपीएससी समन्वय समिती . 
डिसेंबर 2019 मध्ये  बोर्डच्या परीक्षा देत असताना VJA (विजा अ) कॅटेगिरी मधील मुलं तलाठी वनरक्षक तसेच महा आयटीच्या इतर परीक्षेमधून टॉप करत आहेत ते दिसून येत होते. पण आता सरकार बदललेला असल्यामुळे भरती मध्ये कुठलाही गैरव्यवहार होणार नाही. मी आत्मविश्वासाने बोर्ड क्लर्क एक्झाम दिली. डिसेंबर 2019 मध्ये झालेल्या या परीक्षेची जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये कागदपत्र पडताळणी साठी यादी लागली.
          ह्या यादीत पण परत परत येणारी तीच ओळखीची VJA (विजा अ) कॅटेगिरी मधील आडनाव दिसली.
आता मात्र सिस्टीम वरील पूर्ण विश्वास उडाला होता. या विरुद्ध दाद मागण्यासाठी बोर्डात अर्ज केला.बोर्डाचा असे म्हणणे आले की सरकारने घालून दिलेल्या मार्गदर्शक पद्धतीने आम्ही महापरिक्ष कडून ही भरती करून घेतलेले आहे. आणि तुमच्या अर्जाची एक प्रत आम्ही महा आयटी कडेपण पाठवलेली आहे. त्या पत्रात असे नमूद केली होती की महायुतीने मला परस्पर हे कळवावे. अशा पद्धतीने एखाद्या निवड मंडळाने स्वतःवरील पारदर्शक नोकर भरतीची जबाबदारी झटकली. सरकारने आम्हाला महा आयटी ने उच्च गुणवत्ता प्राप्त म्हणून दिलेल्या यादीतून नोकर भरायची करायची आहे, असे असे अध्यक्षांनी मला कळवलेले पत्रात सांगितले आहे.  त्यावेळी अहमदनगर जिल्हा तलाठी मध्ये झालेल्या भरती घोटाळ्यातील सेम कॅटेगिरी मधील मुलं सेम आडनाव असलेले इतर नावाचे लिस्ट मी त्यांना दिल्या होत्या. दुसऱ्या वेळी ज्या वेळेस मी अध्यक्षांना भेटायला गेलो त्यावेळेस मला सचिवांकडे पाठवण्यात आले. सचिवांच्या  स्वीय सहायकाने सचिवांची भेट होऊ दिली नाही. कारण तोही विजा अ कॅटेगिरी चा होता.
 -वैजनाथ गाडे, लातूर.
आज मी स्वतः SEBC आरक्षण cancel झाल्या मुळे आणि आमच्या हक्काच्या सर्व जागा open मधे गेल्या मुळे मी अंतिम यादी च्या बाहेर फेकले गेलो आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्ड मध्ये लिपिक पदी निवड झाली होती. डिसेंबर 2019 मधे तेव्हापासून आज पर्यत आशा होती आज संपली. आज माझा घात झाला आणि माझ्या सारख्या 2185 मुलांचा पण होणारच आहे. सरकारने हे सर्व मुद्दाम हून केल. डॉक्युमेंट verification जानेवारी 2020 मधे झाले होते. त्यानंतर 1 महिना होता नियुक्ती देण्यासाठी पण नाही दिली. मग corona आला. मग आरक्षण कॅन्सल. आणि आज यांनी फायनल लिस्ट revise करून लावली. जणू हे वाटच बघून होते कधी आरक्षण कॅन्सल होत आणि माझ्या सारख्या 2185 मुलांना हे कधी बाद ठरू शकतील. आज माझा आणि माझ्या समाजाचा घात झाला आहे आणि याला सर्वस्वी मी महाराष्ट्र सरकार आणि सर्व मराठा आमदार आणि नेते यांना जबाबदार मानतो आहे. आज मला माझ्या मराठा जाती मुळे नोकरी पासून वंचित ठेवले गेले आहे
गजानन कावरखे , SEBC उमेदवार  

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles