पुणे : सिंगापूर येथून पुण्यात आलेल्या ३२ वर्षीय महिलेचा कोरोंनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून तिला कोथरूड येथे राहत्या घरी विलगीकारण कशात ठेवण्यात आले आहे. परदेशातून भारतात येणार्या नागरिकांच्यावर सरकारचे विशेष लक्ष ठेवले असून त्याची कोरोंना चाचणी केली जाते. बधितांना विलगीकरण कक्षात ठेवण्याची सरकार दक्षता घेत आहे.
संपूर्ण जगाचे लक्ष चीन मधून येणार्या प्रवाशी यांच्यावर आहे. गेल्या काही दिवसात चीनमध्ये कोरोंनाच्या रूग्णांच्यामध्ये विशेष वाढ होत आहे. त्यामुळे २४ डिसेंबरपासून मुंबई, पुणे आणि नागपूर येथील विमानतळांवर प्रवाशांचे थर्मल स्क्रिनिंग करण्यात येत आहे. त्यामध्ये तपासणीत ही महिला पाॅझिटिव्ह आली आहे, अशी माहिती सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. २४ डिसेंबरपासून आतापर्यंत देशातील विमानतळावर ७९ हजार ६८८ प्रवाशांपैकी १४६६ रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली असून त्यापैकी आतापर्यंत ३ रुग्ण पाॅझिटिव्ह आढळून आले असून त्यांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहे. शासकीय यंत्रणेकडून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. यावेळी मात्र कोरोंना बाबत सतर्क राहणे गरजेचे आहे.
- तुमच्या भावाला पुन्हा विधानसभेत पाठवा : वैशाली क्षीरसागर यांचे महिलांना भावनिक साद
- उत्तरची जनता महायुतीच्या बाजूने; राजेश क्षीरसागर यांचा विजय निश्चित : आदिल फरास
- सिद्धार्थनगरशी माझं नातं अतूट : राजेश क्षीरसागर
- राजेश क्षीरसागर यांचा कार्यअहवाल सर्वांगीण कामाचे उत्तम प्रगतीपुस्तक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
- कोल्हापूर उत्तरमुळे जिल्ह्यातील आघाडीच्या दहाही जागा येणार नाही;धनंजय महाडिक