पुढील २ दिवसानंतर पाऊस ओसरणार – हवामानतज्ञ पंजाबराव डख

परभणी: भारतातील प्रसिद्ध हवामानतज्ञ पंजाबराव डख(Punjabrao Dakh) यांनी पुढील दोन दिवसात पावसाचा जोर राहणार असून त्यानंतर २० ते २७ तारखेच्या दरम्यान हवामान कोरडे राहील असा अंदाज व्यक्त केला आहे. तरी या दरम्यान सोयाबीन, भात, मका अथवा तत्सम पिकांची कापणी करून घेण्याचे त्यांनी आवाहन केले.

२० तारखेनंतर महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार वाढणार आहे. परतीच्या पावसामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तरी पुढील आठवड्यात शेतकर्‍यांनी सुगीची कामे करून घ्यावी. अन शेतकर्‍यांनी आपले नुकसान टाळावे. प्रसिद्ध हवामानतज्ञ पंजाबराव डख यांच्या या हवामाना अंदाजामुळे शेतकर्‍यांच्यामध्ये आशावादी वातावरण पसरले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here