कोल्हापूर : सध्या राज्यभर राजाराम सहकारी साखर कारखान्याची(Rajaram Karkhana Sugar Factory) निवडणूक प्रचंड गाजत असून पुन्हा एकदा कोल्हापूरच्या राजकारणातील पारंपरिक प्रतिस्पर्धी आमने-सामने आले आहेत. महाडिक कुटुंबीय विरुद्ध पाटील गट हे समीकरण कोल्हापूरकरांना नवीन नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व इतर सर्वच निवडणुकांची रंगीत तालिम समजली जात असल्याने अत्यंत चुरशीची निवडणूक झाली असून दोन्ही गटांच्याकडून आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या जात आहेत. माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाखाली महाडिक कुटुंबियांची कारखान्यावर निर्विवाद सलग २८ वर्षे सत्ता राहिली असून आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी तगडे आवाहन दिले आहे.
विरोधकांच्या साखर कारखान्यात १२०० किलोचा एक टन असतो, मात्र छत्रपती साखर कारखान्याच्या (Rajaram Karkhana Sugar Factory) सुज्ञ सभासदांना आमच्या वजन काट्यावर पूर्ण विश्वास आहे. अगदी कुठल्याही काट्यावर वजन करून ऊस घातला तरी किलोचाही फरक आढळणार नाही. त्यामुळे हे सभासदच विरोधकांचा काटा काढतील, असा विश्वास माजी आमदार अमल महाडिक यांनी व्यक्त केला.
छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या(Rajaram Karkhana Sugar Factory) निवडणुकीच्या प्रचारार्थ महाडिक गटाकडून कणेरी, कणेरीवाडी गावांमध्ये माजी आमदार अमल महाडिक यांचा दौरा पार पडला. यावेळी सभासदांच्या बैठका घेत त्यानी सभासदांशी संवाद साधला.
”कारखान्याच्या सुज्ञ सभासदांना राजारामच्या वजन काट्यावर पूर्ण विश्वास आहे. अगदी कुठल्याही काट्यावर वजन करून ऊस घातला तरी किलोचाही फरक आढळणार नाही. विरोधकांनी आरोप केला असेल. मात्र त्यांच्या कारखान्याप्रमाणे आपल्याकडे १२०० किलोचा एक टन नसतो, त्यामुळे आमच्यात आणि त्यांच्यात नक्कीच फरक आहे, विरोधकांना आता लक्षात आले आहे की, काट्याचा मुद्दा चालणार नाही. तर नवीन मुद्दा घेऊन दिशाभूल करतील. कारण दिशाभूल करणं हाच त्यांचा प्रचाराचा अजेंडा आहे.”
– माजी आमदार अमल महाडिक
Rajaram Karkhana