Thursday, November 14, 2024

कोल्हापूर उत्तर विधानसभेमधून राजेश क्षीरसागर यांनी अर्ज दाखल केला.

- Advertisement -

दि. २८ ऑक्टोबर : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू व विद्यार्थी सेना ते शिवसेना शहरप्रमुख असा राजकीय प्रवास असलेल्या राजेश क्षीरसागर (Rajesh kshirsagar) यांना उमेदवारी देत पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखविला आहे. क्षीरसागर यांनी दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर उत्तर (Kolhapur North assembly) विधानसभेमधून आपली उमेदवारी निश्चित असल्याचे सांगत सोमवारी अर्ज दाखल करणार असल्याचे स्पष्ट केले होते.

राजेश क्षीरसागर यांनी आज सोमवार, दि. २८ ऑक्टोबर रोजी सकाळी शक्तिप्रदर्शन करत दसरा चौक येथून भव्य रॅलीतून अर्ज दाखल केला आहे. यावेळी खासदार धनंजय महाडिक, सत्यजित (नाना) कदम, महेश जाधव तसेच शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व घटक पक्षाचे जिल्ह्यातील सर्व नेते, जिल्हाप्रमुख, शहरप्रमुख, माजी नगरसेवक, प्रमुख पदाधिकारी व महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.

राजेश क्षीरसागर (Rajesh kshirsagar) यांनी यापूर्वी कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे २००९ आणि २०१४ मध्ये प्रतिनिधित्व केले होते. २०१९ मध्ये त्यांना विजयाची हॅटट्रिक करण्याची संधी होती आणि त्यांनी हवादेखील तयार केली होती. परंतु ऐनवेळी भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या उद्योगपती चंद्रकांत जाधव यांनी त्यांच्या हॅटट्रिकला रोख लावली.

महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये या जागेसाठी जोरदार रस्सीखेच सुरु होती २०२२ च्या पोटनिवडणुकीच्या जोरावर भाजपने या जागेसाठी आग्रह धरला होता पण क्षीरसागर यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यानंतर त्यांना साथ दिली होती तेव्हापासूनच उमेदवारी मिळणार असे म्हणले जात होते आणि ते तयारी देखील करत होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles