चंदगड विधानसभेतून राजेश पाटलांची अजित पवारांकडून उमेदवारी निश्चित ?

- Advertisement -

काल दि. २७ सप्टेंबर शुक्रवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची जनसन्मान यात्रा चंदगड विधानसभेतील नेसरी या ठिकाणी आली. या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. माझे उपमुख्यमंत्री पदाचे रेकॉर्ड कुणीही मोडू शकणार नाही. मी काय आज सरकार चालवत नसून, तिथे गोट्या खेळायला गेलो नाही, केंद्राची व राज्याची सांगड असेल तर देशाचा विकास होतो. असे उपमुख्यमंत्री अजित पवार जनसन्मान यात्रेदरम्यान बोलत होते.

चंदगडसाठी राजेश पाटलांची अप्रत्यक्षपने उमेदवारी जाहीर

आमदार राजेश पाटील यांचे विशेष कौतुक करताना अजित पवार बोलत होते, “राजेश पाटलांनी आतापर्यंत माझ्याकडून १,६०० कोटींचा निधी मतदारसंघात आणला आहे.” त्यांनी विविध योजनांसाठी निधी आणण्यासाठी माझ्याकडे आग्रह केला. अजित पवार यांच्या या घोषणेमुळे राजेश पाटील यांची उमेदवारी आणखी मजबूत झालेली दिसते, आणि आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांच्या नेतृत्वावर जोरदार विश्वास आहे. राजेश पाटील यांच्यासारख्या प्रभावी आमदारांमुळे स्थानिक विकासाचे काम अधिक गतीने होईल, अशी अपेक्षा आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चंदगड विधानसभा मतदारसंघातून आमदार राजेश पाटील यांना पुन्हा उमेदवारीचे संकेत दिले आहेत. “पुढच्या पाच वर्षांसाठी राजेश पाटील यांना विजयी करा,” असे त्यांनी म्हटले आहे. या घोषणेमुळे महायुतीमधील इच्छुकांमध्ये उलथापालथ निर्माण झाली आहे, विशेषत: भाजपकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय शिवाजी पाटील यांच्यासमोर आव्हान निर्माण झाले आहे. राजेश पाटलांच्या उमेदवारीमुळे चंदगड विधानसभेत महायुतीमध्ये तेढ निर्माण होण्यची दाट शक्यता आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील दहा जागांपैकी किती जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पवार गटाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. काही दिवसांपूर्वी कागल विधानसभा मतदारसंघातून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर आता त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड विधानसभेसाठी राजेश पाटलांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब केला आहे. येणाऱ्या आगामी काळात चंदगड विधानसभेसाठी महायुतीतून उमेदवार कोण असेल हे पाहणे औत्सुक्याचे  आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles