प्रसंगी सरकारमधून बाहेर पडू – राजू शेट्टींचा महाविकास आघाडीला इशारा

1 3

- Advertisement -

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज गोकुळ मल्टीस्टेट न करण्याच्या मुद्यावर सत्ताधारी गटाला पाठिंबा दिला.

- Advertisement -

यावेळी बोलताना त्यांनी ऊसाच्या एकरकमी एफआरपीसाठी आमची कोणाशीही दोन हात करायची तयारी आहे. प्रसंगी सरकारमधून बाहेर देखील पडू असा इशारा राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे. निती आयोगाच्या शिफारशीनंतर राज्य सरकारनेही एफआरपी दोन ते तीन हप्त्यांत देण्यासंदर्भात अभ्यास गट तयार केला आहे. राज्यातील इतर निर्णय लवकर होत नसताना अभ्यास गटात तयार करण्यासाठी इतकी घाई का? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी उपस्थित केलाय. त्यामुळे सरकारची एफआरपीबाबतची ही भूमिका संशयास्पद आहे. 

- Advertisement -

1 Comment
  1. AJIT KRISHNAT KHOT says

    तुम्ही बाहेर पडा. एखादा मुहूर्त वगैरे काढणार आहे का बघा पण लवकरात लवकर घरचा रस्ता धरा.

Leave A Reply

Your email address will not be published.