राज्यसभा खासदार धनंजय महाडीक यांचा उचगाव येथे नागरी सत्कार सोहळा

Rajya Sabha MP Dhananjay Mahadik civil felicitation at Uchgaon

कोल्हापूर : कोल्हापूरच्या राजकारणात धनंजय महाडीक(MP Dhananjay Mahadik) यांची अभ्यासू राजकारणी म्हणून ओळख आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत खासदार धनंजय महाडीक यांनी शिवसेना उमेदवार संजय पवार यांचा पराभव करून विजय मिळवला. त्यामुळे राज्यसभा खासदार पदी निवड झाल्याबद्दल भाजपा, उंचगाव यांच्यावतीने उंचगाव येथे भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बांधकाम कामगारांना कार्ड वाटप व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या लोकांचा सन्मान केला. यावेळी उपस्थित नागरिकांशी संवाद त्यांनी संवाद साधला. कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे नागरी सत्कार सोहळ्यास संबोधित करताना त्यांनी नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here