विद्यार्थी पटसंखेनुसार संच मान्यता करून एकाच टप्प्यात 100% शिक्षकांची पदभरती करा

अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी घेऊन जवळपास दोन महिने उलटले असूनही शिक्षक भरती संदर्भात प्रक्रिया सुरू झालेली नाही या कारणास्तव राज्यातील डीएड व बीएड अभियोग्यता धारक विद्यार्थी नैराश्याच्या  परिस्थितीत आहेत.शिवाय कोर्टाने सुद्धा पवित्र पोर्टल नोंदणी सुरू करण्यासाठी सुचना दिली आहे,त्यामुळे आधार वैद्य अवैद्य ही निरंतर प्रक्रिया आहे ती चालूच राहणार आहे. तरी काही अपवादात्मक शाळांना नियम व अटी घालून पटसंखेनुसार संच मान्यता करून एकाच टप्प्यात 100% शिक्षकांची पदभरती करणे व 2nd TAIT उत्तीर्ण विद्यार्थ्यांना तातडीने पवित्र पोर्टल नोंदणी सुरू करणे.

मोठी बातमी | शिक्षण विभागात मोठा भ्रष्टाचार, आयुक्तांचे एसीबीला पत्रमोठी बातमी | शिक्षण विभागात मोठा भ्रष्टाचार, आयुक्तांचे एसीबीला पत्र

15 जून पासुन नविन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत आहे,त्यामुळे तातडीने विद्यार्थ्यांना शाळेवर शिक्षक उपलब्ध करून द्यावेत,अन्यथा विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या रोषाला सामोरे जावे लागु शकते याची नोंद घ्यावी.अन्यथा नाईलाजास्तव पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालय ,जिल्हाधिकारी कार्यालय,आयुक्त कार्यालय येथे शिक्षक मिळण्यासाठी आंदोलन,मोर्चे काढले तर याला सर्वस्वी शासन आणि प्रशासन जबाबदार असेल.

राज्यातील शिक्षकभरती तब्ब्ल 5 वर्षाने होत आहे.त्यामध्ये सरकारने 15 जून पूर्वी 30 हजार शिक्षकांची  भरती करू असं गाजर दाखवलं होतं. आणि आता संचमान्यतेच्या नावाखाली वेळ जात आहे.
आधाराविना कोणत्याही विद्यार्थ्यांच नुकसान होऊ नये तसेच पवित्र पोर्टल लवकर सुरु करून नवीन शिक्षकभरती व्हावी यासाठी पटसंख्येनुसार संचमान्यता करावी अशी अभियोग्यता धारकांची मागणी आहे 

प्रो. बलुशा माने, Shiv Unity Foundation 

Talathi bharti 2023 online form date ; syllabus

त्यामुळे परिस्थिती लक्षात घेऊन योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी यावेळी विद्यार्थ्यानी केली.

Leave a Comment