Friday, July 26, 2024

Rohit pawar |रोहित पवारांना मोठा धक्का| ईडीकडून साखर कारखाना जप्त

- Advertisement -

बारामती अ‍ॅग्रो कंपनीने खरेदी केलेला कन्नड सहकारी साखर कारखाना ईडीने जप्त केला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने ही कारवाई केली असून रोहित पवार Rohit pawar आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला हा मोठा धक्का असल्याचं बोलल जात आहे. ईडीने रोहित पवारांशी संबंधित बारामती अॅग्रो संबंधित औरंगाबादमधील कन्नड साखर कारखान्यातील 161.30 एकरची संपत्ती जप्त केली आहे.Rohit pawar

गेल्या अनेक दिवसांपासून ईडीची कारवाई सुरु होती. ईडीने या प्रकरणी अनेक ठिकाणी छापेमारी देखील केली. कन्नड सहकारी साखर कारखाना डबघाईला आल्यानंतर राज्य सहकारी बँकेने त्याचा लिलाव केला होता. हा कारखाना 50 कोटी रुपयांमध्ये रोहित पवारांच्या Rohit pawar बारामती अॅग्रो लिमिटेडने खरेदी केला. या प्रक्रियेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. याच प्रकरणी ईडीने बारामती अॅग्रोची चौकशी केली. बारामती अॅग्रो, हायटेक इंजिनिअरिंग, समृद्धी शुगर या कंपन्या लिलावात सहभागी आहेत. हायटेक कंपनीने लिलावासाठी पाच कोटी रूपयांची रक्कम भरली होती. ती रक्कम बारामती अॅग्रोकडून घेतल्याची चर्चा आहे. विविध बँकांतून खेळत्या भांडवलासाठी घेतलेली रक्कम बारामती अॅग्रोने कारखाना खरेदीसाठी वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे.

रोहित पवारांनी एक्स वरून दिल उत्तर | Rohit pawar

“मी अन्यायाविरोधात बोलतो, आवाज उठवतो म्हणून माझ्यावर कारवाई केली जाते.. ती करायलाही हरकत नाही.. पण ज्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवतो त्यांच्या प्रश्नांवर कधी कारवाई करणार? त्यासाठी कुणी अडवलंय? असेल हिम्मत तर #पेपरफुटी #महागाई #बेरोजगारी #सरकारी_घोटाळे यांसारख्या मी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर पण कारवाई करा! “

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles