समरजितसिंह घाटगेंनी तुतारी घेवून निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले |

- Advertisement -

कोल्हापूरमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे अत्यंत जवळचे शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे (samarjeetsinh ghatge kagal sabha) यांनी कागलच्या गैबी चौकात शरदचंद्र  पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला. भाजपला रामराम ठोकत आगामी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले आहे.

ज्यांना आमदार केल ते संकटकाळात पळून गेले: शरद पवार

कागलमधील काही लोकांना पक्षाने साथ दिली, त्या लोकांना आमदार केले, परंतु संकट आल्याने ते लोक पळून गेले. येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीत कागलची जनता त्यांना योग्य टी जागा दाखवेल अशी टीका शरद पवार यांनी नाव न घेता हसन मुश्रीफ यांच्यावर टीका केली. कागलमध्ये समरजितसिंह घाटगे यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. तसेच या येणाऱ्या निवडणुकीत निवडून आल्यानंतर समरजितसिंह घाटगे हे केवळ आमदार राहणार नाहीत तर त्यांना मोठी जबाबादारी दिली जाईल, असेही शरद पवार म्हणाले. तसेच पुढे बोलताना त्यांनी राज्य सरकारवरही टीकास्र केली.

पुढे बोलताना पवार म्हणाले की , मी कोल्हापूरच्या गैबी चौकात यापूर्वी अनेक सभा घेतल्या आहेत. परंतु अशी जी गर्दी आज झाली आहे यापूर्वी अशी गर्दी कधीही बघितलेली नाही. आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला, पुरुष, तरुणांसह सर्वच वयोगटाचे नागरिक उपस्थित आहेत. याचा अर्थ समरजितसिंह घाटगे यांनी जो परिवर्तनाचा निर्णय घेतला आहे तो कागलमधील जनतेचं समर्थन करेल हे दिसून येते.

विधानसभा निवडणुकीसाठी “है तय्यार हम” : समरजितसिंह घाटगे

कोल्हापुरातील सामाजिक आणि राजकीय जडणघडणीत घाटगे घराण्याचे महत्त्वाचा वाटा आहे. समरजितसिंह  घाटगे यांनी शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करून कागलमधून विधानसभेची तुतारी फुंकली आहे. समरजितसिंह घाटगे म्हणाले, माझ्यासोबत शरद पवार यांचा आशीर्वाद आहे. सडेतोड बोलताना ते पुढे म्हणाले ‘है तय्यार हम’ असा इशारा हसन मुश्रीफांना दिला. तर दुसरीकडे शरद पवार आणि जयंत पाटील यांनीही आक्रमक भाषणे करून हसन मुश्रीफ यांच्यावर टीका करत त्यांच्या अडचणी वाढवल्या असल्याचे सुतोवाच दिले.

शरद पवार दि. २ सप्टेंबर पासून 4 दिवस कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी महायुतीला भाजपला मोठा धक्का देत समरजितसिंह घाटगे यांना आपल्या पक्षात घेत नवीन यंत्रणा सुरु केली आहे. तसेच कोल्हापुरातील अनेक दिग्गज नेते यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे के.पी.पाटील आणि ए. वाय.पाटलांनी शरद पवार यांची भेट घेतली. काही दिवसापूर्वी भाजपला रामराम ठोकलेले भाजपचे राहुल देसाई सुद्धा शरद पवारांच्या भेटीला आले होते. शरद पवार यांच्या कोल्हापूर दौऱ्यातनंतर कोल्हापुरात मोठी राजकीय उलथापालक होणार हे मात्र नक्की आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles