SBI Clerk Bharti | स्टेट बँकेत ५,२३७ जम्बो लिपिक भरती |अंतिम मुदत – १७ मे

Live Janmat

करोनाकाळात देशातली अर्थव्यवस्था डबघाईला आलेली असताना बेरोजगार तरुणांना दिलासा देणारी एक बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने तब्बल पाच हजारांहून अधिक लिपिक पदांवर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीविषयीची सविस्तर माहिती जाणून घ्या….

देशातली सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने क्लेरिकल केडर मध्ये ज्युनियर असोसिएट पदांवर (Junior Associate Customer Support and Sales) भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केलं आहे. ही भरती तब्बल ५,२३७ पदांसाठी होणारी जम्बो भरती आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि योग्य उमेदवार sbi.co.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

  • महत्वपूर्ण तारखा
  • ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – २७ एप्रिल २०२१
  • ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत – १७ मे २०२१
  • प्री एक्झाम ट्रेनिंग कॉल लेटर – २६ मे २०२१
  • प्रीलिम्स एक्झाम डेट – जून २०२१
  • मेन एक्झाम – ३१ जुलै २०२१

पात्रता

कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा उच्च शिक्षण संस्थेतून कोणत्याही विषयातील पदवी असणे अनिवार्य. जे विद्यार्थी आता अंतिम वर्षाला आहेत, मात्र अजून अंतिम परीक्षा झालेली नाही, ते देखील अर्ज करू शकतात. मात्र त्यांना त्यांचे पदवी प्रमाणपत्र १६ ऑगस्ट २०२१ पूर्वी मिळायला हवे.

वयोमर्यादा
२० ते २८ वर्षे. उमेदवारांचा जन्म २ एप्रिल १९९३ पूर्वी आणि १ एप्रिल २००१ नंतरचा नसावा. वयाची गणना १६ ऑगस्ट २०२१ या तारखेनुसार होईल.

वेतन – १७,९०० रुपये – ४७,९२० रुपये. बेसिक पे १९,९०० रुपये.

अर्ज शुल्क
सामान्य, ईडब्ल्यूएस, ओबीसी – ७५० रुपये
एससी, एसटी, दिव्यांग प्रवर्ग – नि:शुल्क

राज्यनिहाय रिक्त पदांची संख्या नोटिफिकेशनमध्ये प्रवर्गनिहाय देण्यात आली आहे. सर्वाधिक ९०२ पदे गुजरामध्ये भरली जाणार आहेत. महाराष्ट्रात ६४० पदे भरली जाणार आहेत.

महाराष्ट्रातील प्रवर्गनिहाय रिक्त पदे –
सर्वसाधारण – २८६
एससी – ६३
एसटी – ५६
ओबीसी – १७२
इडब्ल्यूएस – ६३
एकूण पदे – ६४०

vishal  के बारे में
vishal The live janmat is a Marathi digital News web portal. We aim to report the latest news, views, and entertainment. We seek to look at policies and decision-making from the perspective of people. Read More
For Feedback - livejanmt@gmail.com