काल जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातून एक जाहिरात प्रदर्शित करण्यात आली आहे. या जाहिरातीत नायब तहसीलदार, संगणक चालक, कारकून, लिपीक, शिपाई पदांटी फक्त तीन महिन्यांच्या कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येत असल्याची माहिती दिली आहे. यामध्ये ही कंत्राट भरती तीन महिन्यांसाठी असेल तसेच आवश्यकता असल्यास पुढील तीन महिने नोकरी कायम राहील, असं स्पष्ट सांगण्यात आलेल आहे.
जाहिरातीत नेमकं काय म्हटलं आहे पहा
1) लवाद (भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण) तथा जिल्हाधिकारी, जळगाव, (2) सक्षम प्राधिकारण तथा उप विभागीय अधिकारी, जळगाव भाग, जळगाव (3) सक्षम अधिकारी, तथा उप विभागीय अधिकारी, भुसावळ भाग, भुसावळ (4) सक्षम प्राधिकारण तथा उप विभागीय अधिकारी, अमळनेर भाग, अमळनेर (5) सक्षम प्राधिकारण तथा उप विभागीय अधिकारी, पाचोरा भाग, पाचोरा आणि (6) सक्षम प्राधिकारण तथा उप विभागीय अधिकारी, चाळीसगाव भाग, चाळीसगांव या कार्यालयांतील पुढील पदांवर मासिक मानधन तत्वावर कामकाज करण्यासाठी केवळ तात्पुरता स्वरुपात ६ महिन्यांचे (प्रथम 3 महिने आणि आवश्यकता असल्यास पुढील 3 महिने) कालावधीसाठी पुढील अटी-शर्ती बंधनकारक ठेवून पात्र सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी आणि उमेदवारांची नियुक्ती करायची आहे.
जळगाव जिल्हाधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण
“मला मदत करण्यासाठी, माझे कोर्ट-कचेरीच्या कामांना सहकार्य करण्यासाठी, माझे प्रश्न समजून घेण्यासाठी, ऑर्डरची ड्राफ्टिंग करण्यासाठी आपण नायब तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांसाठी जाहिरात काढली आहे. ही जाहिरात काढण्यापूर्वी भारत सरकारची परवानगी घेण्यात आली आहे”, असं स्पष्टीकरण जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल आहे.
विद्यार्थ्याना हाताशी धरून राजकारण होतंय का ?
संबंधित जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय लोकप्रतिनिधिनी सोशल मेडियावर प्रतिक्रिया देणे चालू केल आहे. मुळात ही भरती परमनंट नाहीच. शिवाय mpsc च्या कोणत्याही जागा कमी किंवा रद्द करून ही भरती करण्यात येत नाही. ही बाब सर्वानी लक्षात घेणे गरजेचे आहे. काही तत्काळ कामासाठी तातडीने अधिकाऱ्यांची गरज आहे आणि एवढ्या कमी वेळेत आवश्यक ते अधिकारी मिळणे अशक्य आहे.
कंत्राटीच का भरली जात आहेत पद..?
mpsc कडून पद भरती करायची झाल्यास कमीत कमी एका वर्षापेक्षा अधिक काळ जातो. शिवाय ही प्रोसेस वेळ खावू आहे. मुख्य म्हणजे ही कंत्राटी भरती फक्त तीन महिन्यांसाठी आहे. आणि गरज पडल्यास आणखीन तीन महीने. ठराविक कामासाठी ही पदे भरली जात आहेत. शिवाय नियमितपणे होणारी mpsc कडून भरती ही होणारच आहे.