Saturday, July 27, 2024

शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे परीक्षेवर बहिष्कार टाकत आंदोलन सुरू

- Advertisement -

कोल्हापूर :- येथील शिवाजी विद्यापीठात राज्यशास्त्र व अर्थशास्त्र विषयातील विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार (SUK students boycott the exam) टाकत विद्यापीठाविरोधात आंदोलन छेडले आहे.

           राज्यशास्त्र व अर्थशास्त्र अधिविभागाने विद्यार्थांना वेळेत असायमेंट दिल्या नाहीत. त्या पूर्ण करण्यात विद्यार्थी अडकले असता लागोपाठ पेपर असल्याने विद्यार्थ्याचा पुरेसा अभ्यास होऊ शकला नाही. इतर अधिविभागाच्या परीक्षेतील पेपर मध्ये पुरेसा वेळ असून राजशास्त्र व अर्थशास्त्र विषयातील विद्यार्थी यांच्यावर अन्याय होत असल्याने विद्यार्थी यांनी परीक्षेवर सार्वजनिक बहिष्कार (SUK students boycott the exam) टाकला आहे.

maharashtra kesari | पुण्यात होणार महाराष्ट्र केसरीचा थरार

यामुळे प्रशासन विद्यार्थी एकजूटीपुढे नमते घेते की आपल्या आडमुठेपणावर ठाम राहते हे पाहावे लागेल परंतु विद्यार्थी यांचे कोणत्याही परस्थितीत नुकसान होता कामा नये अशी भूमिका आंदोलनकर्त्या मुलांनी घेतली आहे. यावेळी विद्यापीठातील शेकडो विद्यार्थी मनमानी कारभारामुळे रस्त्यावर उतरले आहेत. नव्या वर्षात मुख्यमंत्री फेलोशिप २०२३-२४ कार्यक्रम; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे बैठकीत सादरीकरण

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles