गेली दोन वर्ष कोरोनामुळे विद्यापीठाच्या परीक्षा या ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आलेल्या होत्या. त्यावेळेही विद्यार्थ्यानी परीक्षेसाठी अनेक आंदोलने केलेली. अगदी मागील वर्षीही कोरोना नसताना मोठी आंदोलने करण्यात आली होती. विद्यार्थी परीक्षा पद्धतीमध्ये एकसमानता यावी यासाठी कोर्टमध्येही गेलेली होती. | shivaji university
कोरोणामुळे परीक्षांचे वेळापत्रक कोलमडले होते. सहा महिन्यांची सेमिस्टर 2-3 महिन्यांत शिकवली गेली, अभ्यासक्रम ऑनलाइन शिकवला गेला, मग परीक्षा ऑफलाइन का? अभ्यासाला पुरेसा वेळ नाही मिळाला, अशी अनेक कारणे होती. आता shivaji university हिवाळी सत्राच्या परीक्षा चालू झाल्या आहेत. हिवाळी सत्रातील विविध अभ्यासक्रमांचे सुमारे २ लाख ५० हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्यात कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.बी. ए., बी. कॉम., बी. एस्सी. आदी अभ्यासक्रमांच्या सत्र तीन, चार, पाच आणि सहाच्या, तर अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी) अभ्यासक्रमाच्या द्वितीय आणि चौथ्या वर्षाच्या परीक्षा हिवाळी सत्रामध्ये होतील. या परीक्षा सकाळी साडेदहा ते दुपारी दीड आणि दुपारी अडीच ते सायंकाळी साडेपाच अशा दोन सत्रांमध्ये होणार आहेत. त्यासाठी ‘एसआरपीडी’ प्रणालीद्वारे प्रश्नपात्रिका पाठविण्याची तयारी पूर्ण झाली आहे.
Shivaji University Exam | विद्यार्थांचे आंदोलन सुरूच, परीक्षेचे काय होणार?
राज्य विद्यापीठांच्या परीक्षा आणि निकालांच्या वेळापत्रकात एकसमानता आणणार ? | SPPU exam
shivaji university | परीक्षा ऑफलाइन लेखी स्वरूपात सुरू
यावेळेही काल सोमवारी शिवाजी विद्यापीठात shivaji university राज्यशास्त्र व अर्थशास्त्र विषयातील विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार (SUK students boycott the exam) टाकत विद्यापीठाविरोधात आंदोलन छेडले होते. राज्यशास्त्र व अर्थशास्त्र अधिविभागाने विद्यार्थांना वेळेत असायमेंट दिल्या नाहीत. त्या पूर्ण करण्यात विद्यार्थी अडकले असता लागोपाठ पेपर असल्याने विद्यार्थ्याचा पुरेसा अभ्यास होऊ शकला नाही. इतर अधिविभागाच्या परीक्षेतील पेपर मध्ये पुरेसा वेळ असून राजशास्त्र व अर्थशास्त्र विषयातील विद्यार्थी यांच्यावर अन्याय होत असल्याने विद्यार्थी यांनी परीक्षेवर सार्वजनिक बहिष्कार (SUK students boycott the exam) टाकला आहे. यामुळे प्रशासन विद्यार्थी एकजूटीपुढे नमते घेते की आपल्या आडमुठेपणावर ठाम राहते हे पाहावे लागेल परंतु विद्यार्थी यांचे कोणत्याही परस्थितीत नुकसान होता कामा नये अशी भूमिका आंदोलनकर्त्या मुलांनी घेतली आहे. यावेळी विद्यापीठातील शेकडो विद्यार्थी मनमानी कारभारामुळे रस्त्यावर उतरले होते.