श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना

श्रावणबाळ

श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना

लाभार्थी:

गट (अ) :-65 व 65 वर्षावरील व दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव समाविष्ट असणाऱ्याव्यक्तीना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना गट (अ) मधून रु.400/- प्रतिमहिना निवृत्तीवेतन देण्यात येते याच लाभार्थ्याला केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजनेचे रु.200/- प्रतिमहा प्रति लाभार्थी निवृत्तीवेतन दिले जाते. यामुळे या लाभार्थ्यांना राज्य शासनाकडून रु.400/- प्रतिमहा व केंद्र शासनाकडून रु.200/- प्रतिमहाअसे एकूण रु.600/- प्रतिमहा प्रतिलाभार्थी निवृत्तीवेतन मिळते. गट (ब):-या योजनेतंर्गत ज्या व्यक्तीचे वय 65 व 65 वर्षावरील आहे व ज्यांचे कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न रुपये 21,000/- च्या आत आहे, अशा वृध्दांना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना (गट- ब) मध्ये रुपये 600/- प्रतिमहा प्रतिलाभार्थी निवृत्तीवेतन राज्य शासनाकडून देण्यात येते. ABHA| तुम्ही ‘अभा’ कार्ड काढले आहे का ? जाणून घ्या संपूर्ण प्रकिया!

फायदे:

श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना प्रतिमहा प्रतिलाभार्थी निवृत्तीवेतन रु.600/- अदा करण्यात येते.

अर्ज कसा करावा

अर्जदार जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करु शकतो .संपर्क कार्यालयाचे नाव-जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय

किंवा भेट द्या. https://sjsa.maharashtra.gov.in/mr/scheme-category/special-assistance

अशाच शासकीय महितीसाठी व योजनांच्यासाठी येथे क्लिक करा.

vishal  के बारे में
vishal The live janmat is a Marathi digital News web portal. We aim to report the latest news, views, and entertainment. We seek to look at policies and decision-making from the perspective of people. Read More
For Feedback - livejanmt@gmail.com