Monday, June 24, 2024

Social Media Trend| ‘चाचा विधायक है हमारे’

- Advertisement -

तन्मय फडणवीसांनी लस कशी घेतली, सोशल मीडियावरून देवेंद्र फडणवीसांना सवाल 

रेमडेसिव्हीरच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलं असतानाच आता देवेंद्र फडणवीस यांच्यावर काँग्रेसने हल्लाबोल चढवला आहे. देशात आणि राज्यात करोना संक्रमणाचा प्रसार झपाट्याने होत आहे. तर दुसरीकडे रेमडेसिवीरसह लसींचाही तुटवडा जाणवत आहे. लसींसाठी केंद्राकडे ओरड होत असतानाच विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पुतण्यामुळे अडचणीत आले आहेत. पुतण्या तन्मय फडणवीसने लस घेतल्याचा फोटो सोशल मीडियावर टाकल्यानंतर त्यावरून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काँग्रेसनंही यावरून काही शंका उपस्थित केल्या असून, भाजपावर गंभीर आरोप केला आहे.

https://twitter.com/Cryptic_Miind/status/1384140451855278095?s=20

देशामध्ये 45 वर्षांवरील लोकांनाच लस देण्यात येत असताना तन्मयने लस कशी घेतली असा सवाल अनेक युजर्सनी विचारला आहे. तन्मय पेशाने कलाकार आहे आणि तो फ्रंटलाईन वर्कर नसल्याने तो लस घेण्यास पात्र कसा ठरला, ही वशिलेबाजी नाही का? असा सवाल काहींनी विचारला आहे.

ताज्या बातम्या साठी Email Subscribe करा

“तन्मय फडणवीस 45 वर्षांपेक्षा मोठा आहे का? फ्रंटलाईन वर्कर आहे का? आरोग्य कर्मचारी आहे का? भाजपकडे रेमडेसिव्हीरप्रमाणे लसींचाही गुप्त साठा आहे का?” असे प्रश्न काँग्रेसने उपस्थित केले आहेत. आता जनतेच्या प्रश्नावर फडणवीस मौन सोडणार का, हा सवाल विचारला जात आहे.

https://twitter.com/INCMaharashtra/status/1384156032595685376?s=20

तन्मयने लस घेतल्यानंतर फोटो पोस्ट केला होता. मात्र, यावरून अनेकांनी शंका आणि प्रश्न उपस्थित केल्या. त्यानंतर हा फोटो डिलीट करण्यात आला.

Follow us

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles