महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक ७ ते ९ मे, २०२२ रोजी घेण्यात आलेल्या राज्यसेवा (मुख्य) परीक्षा – २०२१ चा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानुसार एकूण ४०५ पदांकरिता उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे.
नवी मुंबई डाक विभागात ग्रामीण डाक सेवकांच्या रिक्त पदांची भरती | Gramin Dak Sevak
या परीक्षेमध्ये सर्वसाधारण उमेदवारांमधून प्रमोद बाळासाहेब चौगुले, महिलांमधून सोनाली अर्जुनराव म्हात्रे तसेच मागासवर्ग उमेदवारांमधून विशाल महादेव यादव हे राज्यात प्रथम आले आहेत.
निकालाच्या आधारे शिफारस पात्र न ठरलेल्या उमेदवारांना उत्तरपुस्तिका , उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची असल्यास गुणपत्रके त्यांच्या प्रोफाईलमध्ये उपलब्ध झाल्याच्या दिनांकापासून दहा दिवसांत आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने विहित पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. यासंदर्भात आयोगाच्या संकेतस्थळावर उमेदवारांना सर्वसाधारण सूचना दिल्या असल्याची माहिती, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिली आहे.