कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची बदली. कोल्हापूरचे नवीन जिल्हाधिकारी म्हणून राहूल रेखावर यांची नियुक्ती झाली आहे.
कोण आहेत राहुल रेखावर
राहूल रेखावर हे मूळचे खडकी बाजार, तालुका हिम्मतनगर, जिल्हा नांदेड येथील रहिवासी आहेत. त्यांचे पहिली ते दहावी पर्यतचे शिक्षण पीपल्स हायस्कूल मध्ये झाले. बारावीच्या परीक्षेत ते बोर्डात दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यांनी राजस्थानमधील पिलानी येथे इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक्स या विषयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी भाभा अनुशक्ती केंद्रात काम केले आहे. तसेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्येही त्यांनी कामाचा अनुभव घेतला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे 2011 मध्ये घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षेत ते देशात 15 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. त्यांनी सुरुवातीला राजापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी, सिंधुदुर्गचे सहाय्यक जिल्हाधिकारी, हिंगोली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले आहे. फेब्रुवारी 2020 पासून ते जिल्हाधिकारी म्हणून बीड येथे कार्यरत होते.
कर्तव्यकठोरपणामुळे समितीचे थाप ; झेडपीत अविश्वास
2012 साली भारतीय प्रशासन सेवेत दाखल झालेल्या राहुल रेखावर यांना प्रथमच फेब्रुवारी 2015 मध्ये हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशा स्वतंत्र कार्यकारी पदावर सेवेची संधी भेटली. परंतु याच काळात अचानक पंचायत समितीचा हिंगोली दौरा निश्चित झाला. पंधरा दिवसांचा वेळ हाती असतानाही रेखावर यांनी प्रशासन कामाला लावले आणि रात्रीचा दिवस करून सर्व कामाचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार केला. समितीनेही या अहवालाचे कौतुक केले. मात्र या अहवालातून अनेक अनियमित चव्हाट्यावर आला. यामुळे अनेकांचे काळेबेरे उघडे पडले आणि त्यावर कारवाया प्रस्थापित झाल्या. परंतु यामुळे बिथरलेल्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर अविश्वास ठराव आणून तो संमत केला. त्यांना सीईओ म्हणून सहा महिनेच काम करता आले परंतु त्यातून त्यांना खूप काही शिकता आले.