Thursday, November 21, 2024

सुकन्या समृद्धी योजना (SSY) | उद्देश, वैशिष्ट्ये आणि पात्रता

- Advertisement -

सुकन्या समृद्धी योजना (SSY) ही योजना मुलींच्या उज्वल भविष्यासाठी आहे. या योजनेअंतर्गत 10 वर्षाखालील मुलींच्या नावे खाते काढल्यास याचा मुलींना लाभ होऊ शकतो.या योजनेमध्ये एका कुटुंबातील फक्त 2 मुलींना लाभ मिळू शकतो. पण जुळ्या मुली असतील तर त्यांना स्वतंत्र लाभ मिळेल. सुकन्या समृद्धी योजना ही भारत सरकारची एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेचा उद्देश देशातील मुलींचे भविष्य सुरक्षित करणे हा आहे. या योजनेमुळे मुलींना उच्च शिक्षण आणि लग्नासाठी पैसे उपलब्ध होतात.

सुकन्या समृद्धी योजना मुख्य उद्देश | The main objective of the Sukanya Samriddhi Yojana

  1. मुलीचे शिक्षण,आरोग्य, मुलीचे लग्न तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्य सुधारण्याच्या उद्देशानं सुकन्या समृद्धी योजनेची (SSY) सुरुवात करण्यात आली आहे.
  2. मुलींना भविष्यात आत्मनिर्भर बनवण्याच्या दृष्टीने या योजनेची शुरुवात करण्यात आली आहे.
  3. मुलीचे भविष्य सुरक्षित करण्याच्या दृष्टीने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
  4. मुलींना भविष्यात सन्मानाने जगता यावे या दृष्टीने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे
  5. राज्यातील मुलींचा सामाजिक व आर्थिक विकास करणे.
  6. भविष्यात मुलींना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने सुकन्या समृद्धी योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
  7. मुलींचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे.
  8. मुलींचे जीवनमान सुधारणे.
  9. भविष्यात मुलींना स्वतःच्या पायावर उभे करणे.

सुकन्या समृद्धि योजना वैशिष्ट्ये | Features of the Sukanya Samriddhi Yojana

  • राज्यातील मुलीचे भविष्य सुरक्षित करण्याच्या उद्देशाने शासनाद्वारे सुरु करण्यात आलेली सुकन्या समृद्धी योजना (SSY) एक अत्यंत महत्वाची अशी योजना आहे.
  • या योजनेचा कालावधी खाते उघडल्यापासून मुलीचे वय 21 वर्ष होईपर्यंत निर्धारित केला गेला आहे.
  • सुकन्या समृद्धी योजनेचा कालावधी मुलीचे वय 21 वर्षे होईपर्यंत केला गेला असला तरी सुरुवातीच्या फक्त 15 वर्षांपर्यंतच योजनेअंतर्गत पैसे जमा करायचे आहेत.
  • मुलीचे वय 21 वर्षे पूर्ण होण्याअगोदरच जर मुलीचे लग्न झाले तर त्या मुलीला सुकन्या समृद्धी योजनेतुन रद्द केले जाईल व व सदर खाते बंद केले जाईल व या योजनेचा लाभ मुलीच्या पालकांना घेता येणार नाही.
  • या योजनेअंतर्गत जमा रकमेवर टॅक्स भरावा लागत नाही.
  • मुलीचे वय 21 वर्षे होऊन गेल्यावर सुद्धा जर लाभार्थी सुकन्या समृद्धी योजनेच्या (SSY) बचत खात्यातून पैसे काढत नसेल तर त्या जमा रकमेवर सुद्धा व्याज दिले जाईल.
  • मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यावरच मुलीच्या उच्च शिक्षणासाठी तसेच तिच्या आरोग्यासाठी सुकन्या समृद्धी योजनेच्या खात्यातून फक्त 50 टक्के रक्कम काढता येईल.
  • सुकन्या समृद्धी योजनेत दरवर्षी किमान 250/- रुपये भरणे आवश्यक आहे तसे न केल्यास सदर खाते बंद केले जाईल व खाते पुन्हा सुरू करण्यासाठी जितकी वर्षे खाते बंद असेल त्या प्रत्येक वर्षाला 50/- रुपये दंड आकारून खाते पुन्हा सुरू केले जाईल.
  • सुकन्या समृद्धी योजना 100 टक्के सुरक्षित योजना मानली जाते.
  • सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांचा एखाद्या कारणामुळे मृत्यू झाल्यास जमा रक्कम व्याजा सकट लाभार्थ्याच्या पालकांना दिली जाते.

सुकन्या समृद्धी योजनेची पात्रता | Eligibility for Sukanya Samriddhi Yojana

  • मुलीचे वय:  ज्या मुलीसाठी खाते उघडले जात आहे ती 10 वर्षांपेक्षा कमी वयाची असावी.
  • नागरिकत्व:  हे खाते फक्त भारतीय नागरिक असलेल्या मुलीसाठीच उघडले जाऊ शकते.
  • खात्यांची संख्या: प्रत्येक मुलीसाठी फक्त एकच खाते उघडता येते. पालकांना दोन मुली असल्यास फक्त दोन खाती आणि तिहेरी मुले असल्यास तीन खाती उघडू शकतात.
  • ठेवीची पद्धत:  खात्यात ठेवी रोख किंवा चेकमध्ये केल्या जाऊ शकतात.
  • कार्यकाळ:  खाते उघडल्याच्या तारखेपासून 21 वर्षांचा कालावधी असतो. तथापि, मुलीच्या उच्च शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी, 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर, उर्वरित रकमेच्या 50% पर्यंत अंशतः पैसे काढण्याची परवानगी आहे.

सुकन्या योजना कागदपत्रे | Sukanya Samriddhi Yojana Documents

  • मुलीच्या जन्माचा दाखला
  • पॅन कार्ड
  • आधार कार्ड
  • मतदान ओळखपत्र
  • रेशन कार्ड
  • विज बिल
  • मुलीच्या आई-वडिलांचा फोटो  रहिवासी प्रमाणपत्र


Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles