महाराष्ट्रात सुपरफास्ट कोल्हापूर लोकसभा ; “या” विधानसभेत आत्तापर्यंत सर्वाधिक मतदान

- Advertisement -

Kolhapur Lok Sabha राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील एकूण अकरा मतदार संघात दुपारी 1 वाजेपर्यंत  सरासरी 31.55  टक्के मतदान झाले आहे. कोल्हापुरात आज सकाळपासूनच अनेक मतदान केंद्रांवर मतदानासाठी रांगा लागल्या आहेत. कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन लोकसभा मतदारसंघांमध्ये पहिल्या चार तासांमध्ये अत्यंत चुरशीने मतदान सुरू आहे. कोल्हापूरमध्ये शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक अशी थेट लढत होत आहे, तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये तिरंगी लढत होत आहे. राजू शेट्टी विरुद्ध धैर्यशील माने विरुद्ध सत्यजित पाटील सरुडकर असा सामना हातकणंगले लोकसभेसाठी रंगला आहे.

 कोल्हापुरात लोकसभा मतदार संघनिहाय मतदानाची टक्केवारी | Kolhapur Lok Sabha

आज कोल्हापूर लोकसभा Kolhapur Lok Sabha मतदारसंघांमध्ये सकाळी 1 वाजेपर्यंत चंदगड तालुक्यात 37.15 टक्के मतदानाची नोंद झाली. कागल तालुक्यामध्ये 40.03 टक्के मतदानाची नोंद झाली. सर्वाधिक मतदान करवीर तालुक्यात 42.12 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. कोल्हापूर उत्तर मध्ये 37.85 टक्के मतदानाची नोंद झाली. कोल्हापूर दक्षिण मध्ये 35,46 टक्के मतदानाची नोंद झाली. राधानगरीमध्ये 38.18 टक्के मतदानाची नोंद झाली. 

राज्यात एकूण टक्के 31.55 टक्के मतदान | Kolhapur Lok Sabha

लातूर – 32.71 टक्के  
सांगली  – 29.65 टक्के
बारामती – 27.55 टक्के
हातकणंगले – 36.17 टक्के
कोल्हापूर – 38.42 टक्के
माढा – 26.61 टक्के
धाराशिव – 30.54 टक्के
रायगड – 31.34 टक्के
रत्नागिरी-सिंधुदुर्ग – 33.19 टक्के
सातारा – 32.78 टक्के
सोलापूर – 29.32 टक्के

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles