‘MPSC मायाजाल’ म्हणत मुख्य परीक्षा पास स्वप्नील लोणकरची आत्महत्या

Live Janmat

काल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत उत्तीर्ण होऊनही अद्याप नोकरी नसल्याच्या तणावातून स्वप्नील सुनील लोणकर (वय २४, रा. फुरसुंगी) याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचे वडील सुनील लोणकर यांचा शनिवार पेठेत प्रिटींग प्रेसचा व्यवसाय आहे. स्वप्नीने स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी संपादन केली होती. त्याचे आई-वडील शनिवारी सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडले. त्यानंतर त्यांची मुलगी दुपारी साडेचार वाजता घरी आली. तेव्हा स्वप्नीलने त्याच्या खोलीत गळफास घेतल्याचे तिच्या निदर्शनास आले. Swapnil Lonakar passes main exam saying ‘MPSC magic’

स्वप्नील एमपीएससीच्या २०१९च्या पूर्व व मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाला होता. मात्र, त्याची मुलाखत दीड वर्षांपासून झाली नव्हती. त्याचबरोबर त्याने २०२० मध्येही एमपीएससीची परीक्षा दिली. त्यामध्ये पूर्व परीक्षा तो उत्तीर्ण झाला. मात्र, कोरोनामुळे मुख्य परीक्षा झाली नाही. या तणावातून आत्महत्या केल्याचे त्याने मृत्युपुर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केले आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here