Friday, October 4, 2024

राहुल पाटलांना सहानुभूती तरीही नरके डाव जिंकू शकतात का ?

- Advertisement -

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु झालेली आहे. करवीर मतदारसंघाचा विचार केला तर हा कोल्हापूर शहराला लागून ते गगनबावडा तालुक्यापर्यंत पसरला आहे. करवीर विधानसभेत गटा-तटाचे राजकारण दिसून येते कारण येथे असणाऱ्या स्थानिक संस्था, डेअरी, कारखाने यांच्यावर या विधानसभेचे राजकारण अवलंबून आहे.

सध्या करवीर विधानसभेचे चित्र बदलत जात आहे कारण करवीर मतदारसंघातून राहुल पाटील निवडणूक लढवणार आहेत. आमदार पी. एन. पाटील (P.N Patil) यांच्या निधनानंतर करवीर विधानसभेसाठी त्यांचे सुपुत्र राहुल पाटील (Rahul Patil) यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. नुकताच आमदार पी.एन.पाटील यांच्या निधनानंतर शोकसभा आणि समर्थकांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात राजकीय वारसा राहुल पाटील यांनी पुढे चालवावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली.

करवीर विधानसभा मतदारसंघातून (Karvir Assembly election 2024) उमेदवारी मिळवण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार चुरस सुरु आहे परंतु सध्या महाविकास आघाडीकडून राहुल पाटील यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाला असल्याने. महाविकास आघाडीकडे  उमेदवारीसाठी  चेहरा निश्चित झाला आहे परंतु महायुतीमध्ये ही चुरस वाढलेली दिसते कारण महायुतीतून करवीर विधानसभा मतदारसंघासाठी चंद्रदीप नरके हे इच्छुक आहेत परंतु महायुतीतील जनसुराज्य पक्षाचे संस्थापक विनय कोरे यांनी जागावाटपाबाबत इतर घटक पक्षाचा कोणताही विचार न करता आपला उमेदवार करवीर विधानसभेसाठी संताजी घोरपडे (Santaji Ghorpade) यांच्या रूपाने जाहीर केला.

करवीर विधानसभेत उमेदवारीसाठी महायुतीचा पेच वाढला ?

चंद्रदीप नरके (Chandradip Narke) हे इच्छुक आहेत यापूर्वीही चंद्रदीप नरके हे करवीर विधानसभेचे आमदार होते. येणाऱ्या आगामी विधानसभेसाठी त्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. भारतीय जनता पार्टी यांची बूथ रचना आणि चंद्रदीप नरके यांनी केलेली विकासकामे यातून त्यांचा मोठा जनसंपर्क दिसतो त्यामुळे ही विधानसभा निवडणूक त्यांच्यासाठी सोपी होवू शकते अशी करवीर विधानसभेत चर्चा सुरू आहे. याविरुद्ध राहुल पाटील यांना सहानुभूतीचा फायदा मिळेल का? हे ही पहावं लागेल.आगामी येणाऱ्या  करवीर  विधानसभा निवडणुकीचा विचार केला तर महायुती जर एकत्र असेल तर चंद्रदीप नरके की संताजी घोरपडे यांना उमेदवारी मिळू शकते का हे पहावं लागणार आणि महाविकास आघाडीकडून पी.एन. पाटील यांच्या निधनानंतर महाविकास आघाडीकडून राहुल पाटील हे प्रभावी उमेदवार असतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. या विधानसभेत महायुतीतील घटक पक्षातील नेते दावे करू लागल्यामुळे विधानसभा निवडणुकीत जागावाटपावरून चांगलेच घमासान होण्याची शक्यात आहे.


Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles