मुंबई : काही वर्षांपासून शिक्षक भरती प्रलंबित होती. राज्य शासनाने शिक्षक अभियोग्यता २०२३ (TAIT exam) परीक्षेची घोषणा केली व यासाठी अर्ज मागविण्यात आले. परंतू ctet परीक्षा दिलेल्या विद्यार्थी यांचा निकाल प्रलंबित असून विद्यार्थी याबाबत संभ्रमात होते. याबाबत दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन अत्यंत महत्वाचा विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय जाहीर केला. ज्या विद्यार्थ्यांचे CTET परीक्षेचे निकाल प्रलंबित आहेत. आशा विद्यार्थी यांना देखील TAIT exam साठी अर्ज करता येणार असून कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये म्हणून आणखी चार दिवसांची अर्जासाठी मुदतवाड देण्यात आली आहे. संबंधित विद्यार्थी यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. विद्यार्थी यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
- सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकल्या, जानेवारीत होणार निवडणुका |
- मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जाहीर, केंद्र सरकारचा मोठा निर्णय |
- भोसरी विधानसभेत महेश लांडगेंची हॅट्रीक कोण रोखणार?
- तासगाव विधानसभेत महायुती डाव टाकणार, रोहित पाटलांची अडचण वाढली?
- चंदगड विधानसभेतून शिवाजी पाटील तुतारी हातात घेणार ?