talathi bharti – तलाठी महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागाद्वारे २०२३ मध्ये तलाठी भरती परीक्षा घेण्यात आली. ही परीक्षा 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत तीन भागांत एकूण 57 सत्रांमध्ये घेण्यात आली. या परीक्षेसाठी महाराष्ट्रभरातून जिल्हानिहाय तलाठी पदासाठी एकूण 10,41,713 परीक्षार्थींनी अर्ज दाखल केले होते. या उमेदवारांपैकी 8,64,960 उमेदवारांनी परीक्षा दिली. या परीक्षेचा निकाल 5 जानेवारी 2024 रोजी जाहीर करण्यात आला. या निकालानुसार, एकूण 4,466 उमेदवारांची निवड करण्यात आली.
महाराष्ट्राच्या राजकारणात तिसरा मोठा राजकीय भूकंप होणार? |Girish Mahajan
सरकारनं दिलं स्पष्टीकरण
सदर गुण normalisation पद्धती www.mahabhumi.gov.in या वेबसाईटवर दिनांक 27/09/2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. दिनांक 05/01/2024 रोजी या सामान्यीकरण (normalisation) केलेल्या गुणानुसार उमेदवारांना मिळालेले सामान्यीकृत गुण www.mahabhumi.gov.in या वेबसाईटवर तलाठी भरती पोर्टल टॅब वर प्रसिद्ध करण्यात आले. दिनांक 07/01/2024 रोजी काही वृत्तपत्र व दूरचित्रवाहिनी माध्यमातून या सामान्यीकृत गुणाबाबत बातमी देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने स्पष्ट करण्यात येते की, सामान्यीकरण प्रक्रियेदरम्यान काठिण्य पातळीनुसार उमेदवारांना मिळालेल्या गुणांमध्ये वाढ किंवा घट करण्यात येते. त्यामुळे काही उमेदवारांचे सामान्यीकृत गुण हे एकूण गुणांपेक्षा जास्त होऊ शकतात. तलाठी भरती परीक्षेमध्ये एकूण 48 उमेदवारांना 200 पेक्षा जास्त सामान्यीकृत गुण मिळाले आहेत. सामान्यीकृत गुण प्रसिद्धी करणे हे महत्त्वाचे आहे. कारण जेव्हा निवड प्रक्रिया सुरु करण्यात येईल, तेव्हा आरक्षण व सारखे गुण मिळालेल्या अनेक उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांना सर्वाधिक सामान्यीकृत गुण मिळालेले आहेत. त्यांची निवड तर्कसंगतीने करता येणे शक्य होईल व परीक्षार्थीच्या मनात नेमक्या गुणांबाबत गोंधळ उडणार नाही. या तलाठी भरती प्रक्रियेदरम्यान एकूण 500 हरकती आलेल्या होत्या. त्यापैकी 24 हरकती स्विकारण्यात आल्या आहेत. शहीद भगतसिंग यांच्या संदर्भातील प्रश्नावर सर्वात जास्त हरकती आल्याची माहिती समोर आलीये. समन्वय समिति आणि विजय वडेट्टीवार यांनी आक्षेप घेतल्यानंतर या भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. त्यामुळे पाच हजार पदांसाठी राबवलेल्या तलाठी भरतीची गुणवत्ता यादी याच आठवड्यात जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सदर परीक्षा TCS कंपनीच्या माध्यमातून घेण्यात आली असून जेव्हा जेव्हा मोठ्या प्रमाणात परीक्षार्थी परीक्षा देत असतात व त्यामुळे सत्र संख्या अधिक असते त्या त्या वेळेला सामान्यीकरण प्रक्रिया करणे भाग पडते. कारण वेगवेगळ्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या सत्रात घेतलेल्या प्रश्नांची काठिण्य पातळी विचारात घेता उमेदवारांवर अन्याय न करता सर्व उमेदवारांना एकच मोजमाप लावणेसाठीची ही वैज्ञानिक प्रक्रिया आहे. गुण सामान्यीकरणची ही कार्यपद्धती सर्व प्रकारच्या मोठ्या परीक्षांमध्ये जसे की रेल्वे भरती बोर्ड, एस एस सी, म्हाडा इत्यादी मध्ये नोकर भरतीसाठी यापूर्वी वापरण्यात आली आहे. सदर ‘गुण सामान्यीकरण’ www.mahabhumi.gov.in या वेबसाईटवर दिनांक 27/09/2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. तथापि परीक्षेतील या प्रक्रियेबाबत अनभिज्ञता असल्या कारणाने काही वृत्त पत्र/दूरचित्रवाणी माध्यमातून सामान्यीकरण गुणाबाबत बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. गुण सामान्य करण प्रक्रिया ही अनेक सत्रात घेतल्या जाणाऱ्या परीक्षांसाठी अत्यावश्यक असल्याने कोणत्याही उमेदवारावर अन्याय न होण्यासाठी ती तलाठी भरती परीक्षेसाठी पार पाडण्यात आली आहे.
२०० पेक्षा अधिक गुण अशक्य ? | talathi bharti – तलाठी
या परीक्षांमध्ये 200 पेक्षा अधिक गुण काही उमेदवारांना मिळाल्याचे समोर आले आहे. 200 गुणांचीच परीक्षा असताना अधिक गुण कसे मिळाले? हा मोठा गैरप्रकार आहे. भ्रष्टाचार आहे, अशा पद्धतीचे आरोप रविवारी करण्यात आले. याबाबत सर्वच माध्यमात बातम्या प्रकाशित झाल्या आहेत. काही आमदार, काही मंत्र्यांनी सुद्धा हा गैरप्रकार असल्याचा संशय व्यक्त केला आहे.
सरकारकडे चौकशीची मागणी | talathi bharti – तलाठी
तलाठी भरती पेपरफुटी प्रकरणी ठाकरे गट आक्रमक झाला आहे. पुन्हा नव्याने तीन महिन्यात पारदर्शक भरती प्रक्रिया पूर्ण करा, अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी सरकारकडे केली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हंटले की तलाठी भरती हा एक मोठा घोटाळा आहे. या संपूर्ण घोटाळ्याची SIT चौकशी व्हावी ही आमची मागणी आहे. 200 पैकी 214 गुण एका उमेदवाराला मिळत असेल तर परीक्षा घेणारी संपूर्ण यंत्रणा किती गंभीरतेने काम करतय आणि सत्ताधाऱ्यांनी पदभरतीचा कसा खेळखंडोबा करून ठेवलंय हे आता स्पष्ट होत आहे.