स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातील महापरीक्षा पोर्टल, टीईटी घोटाळा, आरोग्य भरती पेपरफुटी, म्हाडा नोकरभरती पेपरफुटी, मुंबई पोलीस भरती पेपरफुटी आदी नोकर भरती घोटाळे उघड केले आहेत. यासाठी पेपरफुटीवर कडक कायदा करण्यात यावा अशी मागणी त्यांनी वारंवार केली आहे. तलाठीचा Talathi Exam पेपर जाहीर झाला तेंव्हा ही त्यांनी mpsc कडून परीक्षा घ्या अशी मागणी केलेली.
“हे दोन निकाल पाहा एकाच व्यक्तीचे हे निकाल आहेत. परीक्षांमध्ये पण फक्त 15 एक दिवसांचा गॅप असेल. वनरक्षक मध्ये 54 मार्क आणि तलाठी मध्ये 200 पैकी 214 मार्क महाराष्ट्र टॉपर. यावरून समजून जावा पेपर कसे झाले आणि मार्क कसे पडले. 99% जागा विकल्या आहेत. सर्व निवड झालेल्या मुलांची न्यायालयीन SIT मार्फत चौकशी झाली पाहिजे तसेच या सर्व मुलांनी कोणत्या सेंटर वर पेपर दिला आहे आणि यांची रॉ मार्क किती आहेत हे सर्वांना समजले पाहिजे. यांची सर्वांची सीसीटीव्ही पब्लिक करायला पाहिजे. सध्याचा सर्वात मोठा घोटाळा हा तलाठी मध्ये झाला आहे. प्रामाणिक मित्रांनो सरळसेवा परीक्षांचा नाद सोडून द्या आपल्याला फक्त @mpsc_office च न्याय देणार. इथे ना कठोर कायदे होणार ना सर्व परीक्षा एमपीएससी कडे देणार इथे सरळसेवा मध्ये फक्त घोटाळेच होणार.” असे आरोप त्यांनी एक्सवर केले आहेत. | Talathi Exam
दरम्यान “तलाठी भरती परीक्षा” Talathi Exam हा एक मोठा घोटाळा आहे. या संपूर्ण घोटाळ्याची SIT चौकशी व्हावी ही आमची मागणी आहे. 200 पैकी 214 गुण एका उमेदवाराला मिळत असेल तर परीक्षा घेणारी संपूर्ण यंत्रणा किती गंभीरतेने काम करतय आणि सत्ताधाऱ्यांनी पदभरतीचा कसा खेळखंडोबा करून ठेवलंय हे आता स्पष्ट होत आहे…” अस वक्तव्य काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात तिसरा मोठा राजकीय भूकंप होणार? |Girish Mahajan
रविवारी देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील नवीन भाजप कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी कार्यालयाची पाहणी केल्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. तलाठी भरतीत राज्यात मोठा गैरव्यवहार झाल्याचे आरोप करण्यात आले आहेत. याबाबत विचारणा केली असता फडणवीस म्हणाले की, तलाठी भरती परीक्षा ही राज्यात अतिशय पारदर्शक पद्धतीने राबविण्यात आली. या परीक्षेत कोणताही गैरव्यवहार झाल्याचा पुरावा कोणीही दिल्यास त्याची चौकशी केली जाईल. पुरावे योग्य असल्यास चौकशी करून ही परीक्षा रद्द केली जाईल आणि दोषींवर कारवाईही केली जाईल. अशी प्रतिक्रिया दिली.
तलाठी भरतीत Talathi Exam मोठा घोटाळा झाल्याचे आमचे आधीपासूनच मत आहे, निकालानंतर त्याला दुजोरा मिळताना दिसतो आहे. तलाठी भरतीत ज्या मुलांवर आधी पेपरफुटीचे गुन्हे दाखल आहेत, अशा बऱ्याच मुलांना १९० पेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. काही मुले तर गुन्हे दाखल असताना खोटी चारित्र प्रमाणपत्र काढून ते व्हेरिफिकेशन वेळेस दाखऊन दुसऱ्या पदावर नोकरी करत आहेत. त्यामुळे या सर्व प्रकारची चौकशी व्हावी, अशी मागणी समितीचे अध्यक्ष राहुल कवठेकर यांनी केली आहे.