Tauktae Cyclone | ‘बॉम्बे हाय’ जवळ अडकलेल्या 400 पैकी 132 जणांची सुटका

Live Janmat

तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि गुजरातमधील दोन लाखाहून जास्त लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे, तर यादरम्यान बॅाम्बे हाय तेलक्षेत्राजवळ बार्जवर 273 जण, तर आणखी एका बार्जवर 137 जण अडकल्याची माहिती आहे.

रात्रभर INS कोची आणि INS कोलकाता या नौदलाच्या बोटींद्वारे हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं.

नौदलाच्या या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये आता एनर्जी स्टार आणि ग्रेट शिप अहल्या या दोन बोटीही सहभागी झालेल्या आहेत. तौक्ते चक्रीवादळामुळे बॉम्बे हाय तेलक्षेत्रात 400 जण अडकले होते. सोमवारी रात्री उशीरा यापैकी 132 जणांची सुटका करण्यात आली.

आज सकाळपासून जामनगरात वादळी वारे, सूरत विमानताळही बंद

मुंबईनंतर गुजरातला तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा…

चक्रीवादळाचा धोका लक्षात घेत गुजरात सरकारने दीड लाखांपेक्षा जास्त लोकांना सुरक्षित स्थळी हटवलंय. तर चक्रीवादळाचा फटका बसत असलेल्या गुजरातमधल्या भागांमधलं कोव्हिड लसीकरण केंद्र सरकारच्या सूचनेनुसार थांबवण्यात आलंय. मदत आणि बचाव कार्यासाठी NDRF आणि SDRF ची पथकं तैनात करण्यात आली असून सैन्याच्या तुकड्याही मदतीसाठी सज्ज आहेत.

vishal  के बारे में
vishal The live janmat is a Marathi digital News web portal. We aim to report the latest news, views, and entertainment. We seek to look at policies and decision-making from the perspective of people. Read More
For Feedback - livejanmt@gmail.com