Sunday, March 19, 2023
No menu items!
Homeकर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयास परदेशातून आणले दहा 'ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर'

कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयास परदेशातून आणले दहा ‘ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर’

आ.रोहित पवारांच्या कामावर प्रभावित होऊन सामाजिक संस्थांची मदत

कर्जत- कोरोनाच्या रुग्णसंख्येचा आकडा दिवसेंदिवस वाढत असला तरी या रुग्णांना चांगल्या प्रकारे उपचार मिळण्यासाठी आ.रोहित पवार (MLA Rohit Pawar) प्रयत्नशील आहेत. त्यांच्या नियोजनातून रुग्णांना चांगल्या सुविधा आणि उपचार मिळत असुन अनेक रुग्ण उपचार घेऊन आपल्या घरी परतत आहेत. त्यांच्या याच कामाने प्रभावित होऊन काही सामाजिक संस्थांनी आ.रोहित पवार यांच्याकडे सुमारे १० ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर (Oxygen Concentrators) मदत म्हणुन दिले आहेत. विशेष म्हणजे ही उपकरणे सध्या सहजासहजी उपलब्ध होत नसल्याने परदेशातुन मागवण्यात आली आहेत.

ही उपकरणे नुकतीच आ.रोहित पवार यांनी उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाकडे सुपूर्द केली. यावेळी प्रांताधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार नानासाहेब आगळे, पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव,गट विकासाधीकारी अमोल जाधव,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संदीप पुंड उपस्थित होते. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर’ या साधनात इलेक्ट्रिक प्रणालीवर हवा आणि पाण्याद्वारे ऑक्सिजनची निर्मिती केली जाते.

एकावेळी पाच लिटर ऑक्सिजन सांभाळण्याची क्षमता असल्याने याचा फायदा गरज असलेल्या कोरोना रुग्णांना होणार आहे. मदतीच्या आवाहणातून अनेक नागरिक व सामाजिक संस्था मदत देऊन या कठीण काळातही माणुसकीचे दर्शन घडवत आहेत ही नक्कीच प्रत्येकाला ऊर्जा देणारी बाब आहे. 

मदतीसाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक नागरिक व सामाजिक संस्था पुढे येत आहेत याचा मला निश्चित आनंद आहे.आता पुढील काळातही आणखी काही ‘ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर’ची मदत होणार आहे.मदतीसाठी सरसावलेल्या सर्वांचे मी आभार मानतो.

आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar)

आ. रोहित पवार हे आपल्या मतदारसंघासाठी कायम कटिबद्ध आहेत, कोरोना महामारीच्या या परिस्थितीत कर्जत उपजिल्हा रुग्णालयाला सामाजिक संस्थांच्या माध्यमातून दिलेली ऑक्सिजन कॉन्सनट्रेटरची ही मदत रूग्णांसाठी अतिशय महत्वपूर्ण अशी आहे.

– सोमनाथ वाघमारे, (खेड-कर्जत)

ताज्या बातम्यासाठी तुमचा Email Subscribe करा

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular