Friday, June 14, 2024

यंत्रमाग धारकांच्या समस्यांवर उपाययोजना सुचविण्यासाठी गठित समितीच्या अहवालाचे प्रारूप वस्त्रोद्योग मंत्र्यांना सादर

- Advertisement -

यंत्रमाग धारकांना (२७  HP) ते (२०१ HP)  या प्रवर्गातील घटकांना प्रति युनिट ७५ पैसे अतिरिक्त वीज सवलत देण्याबाबत शासनाने प्रस्तावित केले आहे. याच धर्तीवर  साध्या यंत्रमाग धारकांना (२७ HP ) खालील प्रति युनिट ७५  पैसे  वीज सवलत मिळण्याबाबची शिफारस गठित समितीने केली आहे. याबाबतचा  प्रस्ताव  तातडीने तयार करावा, असे निर्देश वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

राज्यातील यंत्रमागधारकांच्या समस्यांचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या समितीच्या अहवालाचे प्रारूप आज सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत वस्त्रोद्योग मंत्री श्री. पाटील यांच्याकडे सादर करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी वस्त्रोद्योग विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह, वस्त्रोद्योग आयुक्त गोरक्ष गाडिलकर, उपसचिव श्रीकृष्ण पवार संबंधित अधिकारी उपस्थित होते.

वस्त्रोद्योग मंत्री श्री. पाटील म्हणाले की, राज्याच्या अर्थव्यवस्थेत वस्त्रोद्योग क्षेत्राची महत्वाची भूमिका  आहे. या घटकांना चालना देण्यासाठी शासन सकारात्मक निर्णय घेत आहे. साध्या यंत्रमागधारकांनी विविध बँका वित्तीय संस्थांकडून व्यवसायाकरिता घेतलेल्या मुदती कर्ज, कॅश क्रेडिट व खेळत्या भांडवलासाठी घेतलेल्या सर्व प्रकारच्या कर्जावर 5 टक्के याप्रमाणे व्याज अनुदान देण्यात यावे याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे सांगून याबाबतचा प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना वस्त्रोद्योग मंत्री श्री. पाटील यांनी दिल्या.

वीज बिलातील पोकळ थकबाकी वरील व्याज रद्द करणे,सौर ऊर्जा वापर, सौर ऊर्जा प्रकल्प उभारणी, नवीन वीज जोडणीसाठी ऑनलाईन नोंदणी एक वेळची निर्गम योजना, राज्यातील यंत्रमागांची गणना, अल्पसंख्यांक यंत्रमाग धारक, मिनी टेक्स्टाईल पार्क योजना राबविणे, भांडवली अनुदान, एक जिल्हा एक उत्पादन(ओडीओपी ), टेस्टिंग लॅब, आपत्कालीन व्यवस्था, मूलभूत पायाभूत सुविधा, उद्योग भवन उभारणे, सांडपाणी प्रक्रिया, आयात माल, यंत्रमाग पुनर्स्थापना याबाबत सकारात्मक चर्चा करून यंत्रमाग कामगार कल्याण मंडळ स्थापन करण्याबाबत  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिफारस करण्यात येईल. मल्टी पार्टी वीज जोडणी बाबतही उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिफारस करण्यात येईल असे मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

या समितीचे अध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे, आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार  राईस शेख, प्रवीण दटके, मंत्री सुभाष देशमुख हे समितीचे सदस्य तर व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ हे सदस्य सचिव आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles