Monday, May 29, 2023
No menu items!
Homeकोल्हापूरनिवडणूक राजाराम कारखान्याची पण कोल्हापुरात चर्चा 'डी वाय पाटील' कारखान्याची

निवडणूक राजाराम कारखान्याची पण कोल्हापुरात चर्चा ‘डी वाय पाटील’ कारखान्याची

कोल्हापूर : राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या (Rajaram Sakhar Karkhana) होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा पाटील गट आणि महाडिक गट आमने-सामने पाहायला मिळत आहेत. महाडिक गट आणि पाटील गट यांच्यामध्ये परस्पर विरोधी आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात असतानाचे चित्र सध्या कोल्हापूरमध्ये आहे. कोल्हापूरवासियांचे लक्ष 25 तारखेच्या निकालावरती आहे. राजाराम सहकारी साखर कारखान्यावर बाजी कोण मारणार याबद्दल सभासदारांमध्ये चोरटी चर्चा सुरू आहे. अशातच महाडिक गटाने उचलून धरलेल्या मुद्दा म्हणजे सप्तगंगा कारखाना अर्थात सध्याचा डी.वाय.पाटील साखर कारखाना खूप चर्चेत आहे. 

नक्की काय आहे सप्तगंगाच प्रकरण थोडक्यात जाणून घेऊया…

मुळात सप्तगंगा सहकारी साखर कारखाना आणि डी.वाय.पाटील कारखाना (d y patil suger factory) हे दोन वेगवेगळे कारखाने नसून हा कारखाना एकच कारखाना आहे. कारखान्याचे पूर्वीचे नाव सप्तगंगा सहकारी साखर कारखाना असे होते, बंटी पाटील यांनी कारखाना ताब्यात घेतल्यानंतर जवळपासस ५००० पेक्षा जास्त सभासदाचं सभासदत्व रद्द केल्याचा आरोप महाडीक गटाकडून केला जात आहे. या कारखान्यांमध्ये पुन्हा निवडणुकाच लागणार नाही असे चित्र उभे केले असल्याची चर्चा आहे. थोडक्यात सहकाराचे खाजगीकरणात रूपांतर केले या मुद्द्याला घेऊन सप्तगंगाच्या कमी केलेल्या सभासदांच्या मध्ये प्रचंड नाराजी आहे. या आणि गोकुळ मध्ये सुरू असलेल्या गोंधळावरुन माजी मंत्री बंटी पाटील यांचे सत्ताकेंद्री मनीषा साफ दिसून येते.

आमदार सतेज उर्फ बंटी पाटील राजाराम सहकारी साखर (Rajaram Sakhar Karkhana) कारखान्याच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचारदौऱ्यात सहकार वाचविण्यासाठी लढाई असल्याचे सातत्याने नमूद करतात. महाडिक कुटुंबाने यास प्रतिउत्तर देत आवाहन केले आहे की पहिला सप्तगंगाच्या सभासदांना सभासदत्व द्या. पुन्हा एकदा डी.वाय.पाटील कारखाना (d y patil suger factory) सहकारी साखर कारखाना करा आणि मग राजारामच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरा.. 

परंतु महाडिक कुटुंबाने उपस्थित केलेल्या सप्तगंगा मुद्द्यावर माजी मंत्री पाटील कुठल्याही पद्धतीचे भाष्य करताना दिसत नाहीत. त्यामुळे पाणी कुठेतरी मुरतय. याचीही चर्चा सभासदांमध्ये आहे. आता या निवडणुकीच्या दरम्यान बंटी पाटील हे सप्तगंगाचा मुद्दा कसा खोडून काढतात याकडेचं सर्व कोल्हापूरचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular