मुंबई, दि. २० : भारत निवडणूक आयोगाने दि. १ जानेवारी, २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केलेला आहे. या कार्यक्रमानुसार मतदार यादीची (voter list 2024) अंतिम प्रसिध्दी करण्याचा दिनांक २२ जानेवारी, २०२४ (सोमवार) असा होता.
- “How Rs 12 Lakh Tax Exemption Works Under New Regime”
- Union Budget 2025-26: Sector-Wise Highlights | Download PDF
- कोल्हापुरातील आयटी पार्क साठी शेंडा पार्क येथील 35 हेक्टर जमीन हस्तांतरित करावी -आमदार अमल महाडिक यांची मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मागणी
- DeepSeek: चीनच्या AI स्टार्टअपने तंत्रज्ञान विश्वाला हादरवले
- What’s DeepSeek? The Chinese AI, Challenging US Dominance
तथापि, राज्य शासनाने १९ जानेवारी, २०२४ रोजीच्या अधिसूचनेनुसार सोमवार २२ जानेवारी, २०२४ रोजी श्री राम लल्ला प्राण-प्रतिष्ठा दिनानिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे भारत निवडणूक आयोगाने त्यांच्या १९ जानेवारी, २०२४ रोजीच्या पत्रान्वये राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाच्या अंतिम मतदार याद्या २३ जानेवारी, २०२४ (मंगळवार) रोजी करण्याचे निर्देश दिले आहेत, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय यांच्या मार्फत कळविण्यात आले आहे.voter list 2024