इंडिया आघाडी आता शिल्लक राहिलेली नाही – प्रकाश आंबेडकर

0 14

- Advertisement -

गेल्या काही महिन्यापासून वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सहभागी होण्यास उत्सूक आहे. वंचितच्या मविआमधील सहभागाबद्दल अद्याप कोणतीही गोष्ट निश्चित झालेली नाही. ठाकरे गट आणि शरद पवार गटाने त्यास हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर काँग्रेसवर नाराज असल्याचे दिसले. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी इंडिया आघाडीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. इंडिया आघाडी आता शिल्लक राहिलेली नाही, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधकांची एकमोट झालेली बघायला मिळाली होती. देशभरातील विरोधी पक्षांचे नेते एकत्र आले होते. त्यांनी देशात नव्या आघाडीची स्थापना केली. गेली काही महीने आघाडीच्या अनेक बैठका पार पडल्या आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज पुन्हा जागावाटपाबाबत बैठक पार पडली. मुंबईच्या ट्रायडेंट हॉटेलमध्ये ही बैठक पार पडली. या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे देखील उपस्थित होते. या बैठकीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली. इंडिया आघाडी शिल्लक राहिलेली नाही. मात्र महाविकास आघाडीचं इंडिया आघाडी होऊ देणार नाही, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यावर राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क केले जात आहेत.

kolhapur loksabha |कोल्हापूर लोकसभेसाठी आघाडीच ठरलं; शाहू महाराज निवडणूक रिंगणात ?

- Advertisement -

आमचं आता ठरलेलं आहे, या आघाडीचं इंडिया आघाडी होऊ नये अशी दक्षता घेण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. त्यामुळे ताक जरी असलं तरी फुकून फुकून प्यायचं असं मी ठरवलेलं आहे. इंडिया आघाडी आता शिल्लक राहिलेली नाही. अखिलेश आणि काँग्रेस जे शेवटचे पार्टनर राहिले होते, पण आता दोघेही वेगळे झाले आहेत. काँग्रेस आणि एसपी हे वेगळे चालले आहेत. ते होऊ नये अशी माझी इच्छा आहे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केल आहे.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.