Saturday, July 27, 2024

…अन्यथा नवनियुक्त सदस्यांचे सदस्यत्व होणार रद्द|Gram Panchayat 

- Advertisement -

         महाराष्ट्रभर ग्रामपंचायत निवडणुका प्रक्रिया पार पडून नवनियुक्त सदस्य पदभार सांभाळत आहेत. परंतु या शासननिर्णयाने (Gram Panchayat) सदस्यांच्या मध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. पुढील कारणामुळे नवनियुक्त सदस्यांचे सदस्यत्व रद्द होणार आहेत. 

      महाराष्ट्र ग्रामपंचायत (Gram Panchayat) अधिनियम कायदा १९५८ नुसार पुढील परस्थितीत होणार सदस्यत्व रद्द शासकीय जमिनीवर किंवा मालमत्तेवर अतिक्रमण केले असल्यास अशा व्यक्तीस (ग्रामपंचायत सदस्य अपात्र नियम अतिक्रमण) अपात्र ठरविण्यात येते. (कलम १४ ज). (सध्या गायरान अतिक्रमण प्रश्न गाजत आहे. या प्रकरणी बरेच सदस्य यांचे सदस्यत्व धोक्यात येऊ शकते.)

  • दोन पेक्षा जास्त अपत्य असतील. (१२ सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेले) तर ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच म्हणून राहण्यास पात्र राहणार नाही किंवा अपात्र ठरविण्यात येतील. (कलम १४ त्र -१).
  • ग्रामपंचायतीच्या वतीने केलेल्या कोणत्याही करारात सदस्य स्वतः किंवा भागीदारांमार्फत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रित्या हिस्सा किंवा हितसंबध (वैयक्तिक फायद्यासाठी गुप्त कारण उदा. पैसा किंवा सत्ता) गुंतले असल्यास सरपंच, उपसरपंच, सदस्य अपात्र ठरवता येते. (कलम १४ छ).प्रयाग चिखली ग्रामपंचायत मध्ये आता ”रोहित” पर्व
  • अस्पृशता अधिनियम, १९५५ किंवा मुबंई दारूबंदी अधिनियम, १९४९ किंवा तत्सम कायद्याखाली दोषी ठरविल्या असल्यास अशी व्यक्ती ग्रामपंचातीची कोणतेही पद धारण करण्यास अपात्र ठरते. (कलम १४ क – एक).
  • ग्रामपंचायतीचे किंवा जिल्हापरिषदेला देणे असलेले कर किंवा फी रक्कम मागणी केल्यापासून तीन महिन्यांच्या आत भरण्यास कसूर केल्यास संबंधित सरपंच, उपसरपंच, सदस्य यांचेवर अपात्रतेची कार्यवाही करता येते. (कलम १४ -ज). (हा शासन निर्णय बऱ्याच ठिकाणी पायदळी तुडवला जातो. यात बरेच दोषी सापडू शकतात.)
  • परकीय राज्याचे नागरिकत्व स्वीकारल्यास सदर व्यक्ती ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य राहण्यास अपात्र ठरवता येते. (कलम १४-त्र). (सीमावर्ती भागात लग्न होऊन जर राज्य बदलत असेल अन् दोन्ही ठिकाणी नोंद असेल तर अशा महिला सदस्यांवर कारवाही होऊ शकते.) वडगणेत सदाशिव मास्तर गटाने केले सत्ताधार्‍यांना चारीमुंड्या चीत
  •  जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आल्यास अशी व्यक्ती ग्रामपंचायत सदस्य म्हणून अपात्र ठरविण्यात येते. जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती पदावर निवडून आल्यास त्वरित एका पदाचा राजीनामा देणे आवश्यक आहे. (कलम १४ ज-२).
  • शासकीय जमिनीवर किंवा मालमत्तेवर अतिक्रमण केले असल्यास अशा व्यक्तीस (ग्रामपंचायत सदस्य अपात्र नियम अतिक्रमण) अपात्र ठरविण्यात येते. (कलम १४ ज).
  • राज्य निवडणूक आयोगाने निर्हर (अपात्र) ठरविलेल्या व्यक्ती पदावर राहण्यास अपात्र ठरविण्यात येते. (कलम १४ क).
  • राज्य निवडणूक आयोगाने निर्धारीत केलेल्या वेळेमध्ये आणि आवश्यक केलेल्या रीतीने निवडणूकीचा जमा खर्च सादर न केल्यास अशा व्यक्तीस अपात्र ठरविण्यात येते. (कलम १४ ब ).
  • ग्रामपंचायत (Gram Panchayat) सरपंच, उपसरपंच, सदस्य शौचालय बांधकाम करून वापर करीत नसल्यास अपात्र ठरविण्यात येते.  (कलम १४ ज -५).
  • अशी व्यक्ती जी वेडसर किंवा सक्षम न्यायालयाने जीला विकल मनाची म्हणून घोषित असेल त्या व्यक्तीला सरपंच, उपरपंच, सदस्य म्हणून अपात्र राहते. (कलम १४ -ख).
  • ती व्यक्ती नादार (दारिद्र्य, दिवाळखोरी) असेल किंवा तीने नादारीतून मुक्तता मिळवली नसेल अशी व्यक्ती ग्रामपंचायतीचे कोणतेही पद धारण करण्यास अपात्र ठरते. (कलम १४ ग). 
  • कर्तव्यात कसूर केल्यास विभागीय आयुक्तांकडून सदर व्यक्तीला पदावरून काढून टाकण्यात येते. (कलम ३९).
  • ग्रामपंचायतीच्या परवानगी शिवाय लागोपाठ ६ महिने बैठकीला गैरहजर राहिल्यास त्याचे सदस्य पद अपात्र ठरविण्यात येते. (कलम ४०).
  • ग्रामपंचायत(Gram Panchayat) मासिक सभा/बैठका न घेतल्यास सरपंच, उपसरपंच पद अपात्र ठरविण्यात येते. (कलम ३६).
  • शासकीय रक्कमेचा अपहार केल्याचे सिद्ध झाल्यास जिह्याधिकारी हे संबंधीतास अपात्र ठरवितात. (कलम १४०-५).
  • नियमाप्रमाणे सहा ग्रामभांपैकी एकही ग्रामसभा घेण्यास कसूर केल्यास संबंधित सरपंच/उपसरपंच यांना अपात्र ठरविण्यात येते. (कलम ७).
  • ग्रामपंचायत (Gram Panchayat) अधिनियम कलम १४५ नुसार १२४ व कलम ४५ मधील कामे करण्यास ग्रामपंचायतीने कर्तव्यात कसूर केल्यास ग्रामपंचायत विघटीत/विभाजित करण्यात येते.
  • ग्रामपंचायतीचे कोणतेही मालमत्तेची व पैशाची हानी व अपव्यय व दुरुपयोग केल्यास संबंधिताचे पद अपात्र करता येते. (कलम १७८-१).
  • शासकीय रक्कमेचा अपहार केल्याचे सिद्ध झाल्यास जिह्याधिकारी हे संबंधीतास अपात्र ठरवितात. (कलम १४०-५).

यापैकी कोणतेही कारणी ती व्यक्ती जर दोषी ठरत असेल तर संबंधित सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी अथवा निवडणूक आयुक्त यांच्याकडे आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक देखील या विरोधात तक्रार करू शकतात. कोल्हापूर जिल्ह्यातील बऱ्याच ग्रामपंचायत सरपंच, सदस्य यांचे यांचे सदस्यत्व रद्द झाले आहे. परंतु बऱ्याच गावातील शासकीय जमिनीत अर्थात गायरान, वनविभाग यांमध्ये अतिक्रमण करून देखील विद्यमान सदस्य, सरपंच आदी पदांचा कार्यभार दोन्ही पक्षांच्या संगनमताने पाहतात. या विरोधात सामान्य नागरिकांनी जरी तक्रार केली तरी बऱ्याच सदस्यांचे सदस्यत्व रद्द होऊ शकते. 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles