Thursday, November 14, 2024

उद्योगजगताचा खरा हिरा हरवला, रतन टाटांच्या निधनानंतर देशात शोककळा|

- Advertisement -

Ratan Tata Passed Away: गेल्या सोमवारी पहाटे रक्तदाब कामी झाल्याने रतन टाटांना ब्रिच कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी रात्री त्यांचे निधन झाले.

उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) हे भारतीय उद्योगक्षेत्राचे विश्वासार्ह आणि आश्वासक चेहरा होते. त्यांनी टाटा उद्योगसमुहाला आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान, प्रतिष्ठा आणि विश्वासार्हता प्राप्त करून देत, देशाचा गौरव वाढवण्यासाठी मोठे कार्य केले. सचोटी आणि प्रामाणिकपणाने उद्योग क्षेत्रात यश प्राप्त करणे शक्य आहे, हे त्यांनी आपल्या कार्यातून सप्रमाण सिद्ध केले. संकटकाळात देशवासियांच्या मदतीस धावून येणारा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा टाटा उद्योगसमुह म्हणजे देशभक्तीचे प्रतीक बनले आहे. त्यांनी सर्वसामान्य भारतीयांचे स्वप्न साकार करण्यासाठी ‘नॅनो’ कारची निर्मिती केली, ज्यामुळे अनेकांना स्वामित्व मिळाले.

टाटा उद्योगसमुहाचे संस्थापक नुसेरवानजी आणि जमशेटजी टाटा यांचा वारसा त्यांनी यशस्वीरित्या पुढे नेला. रतन टाटा साहेबांचा अभिमान प्रत्येक भारतीयाच्या मनात आहे, आणि त्यांच्या निधनाने भारतीय उद्योगजगतात एक मोठा शोक व्यक्त झाला आहे.

रतन ते टाटा हे भारताचा अभिमान होते, येत्या पिढीच्या उद्योजकांसाठी ते नेहमीच एक आदर्श राहतील रतनजी टाटा यांनी अतिशय कौशल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या अनेक कंपन्यांना टेक-ओव्हर करून व्यवसाय वाढवला. माहिती तंत्रज्ञानाच्या नव्या क्षेत्रात ही त्यांनी दमदारपणे आघाडी घेतली. नैतिकता जपत उद्योगाबरोबरच देश आणि समाजाचा विकास करण्याची त्यांची विचारधारा होती. त्यांचे निर्णय, धाडसी वृत्ती आणि सामाजिक बांधिलकी यांचे स्मरण कायम राहणार आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी म्हटले आहे.

ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata)यांच्या निधनाने अवघ्या देशाला मानवतेच्या श्रीमंतीची अनुभूती देणारे एक ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले आहे, त्यांच्या निधनाने मानवता, दातृत्त्व, विश्वासार्हतेचा मानबिंदू हरपला आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपल्या शोकसंवेदनेत म्हटले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी रतन टाटा यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करताना म्हटले की, “रतन टाटा साहेबांच्या निधनामुळे भारतीय उद्योगक्षेत्रात एक मोठा तुटवडा झाला आहे. टाटा परिवार आणि रतन टाटा साहेबांच्या चाहत्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि सद्गतीसाठी प्रार्थना करतो.”

रतन टाटा यांच्या कार्याची छाया आणि त्यांचा आदर्श संपूर्ण भारतीय समाजावर सदैव राहील.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles