Tuesday, October 8, 2024

शिवजयंती दिनी बहुप्रतिक्षीत ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ चित्रपटाच्या मुख्य पोस्टरचे प्रकाशन

- Advertisement -

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी प्रमाणे यंदाही बाजीराव रोड, पुणे इथे भव्य दिव्य अशा शिवजन्मोत्सव स्वराज्य रथ सोहळ्यातील स्वराज्य रथाचे स्वागत करण्यासाठी शिवनेरी फाऊंडेशन पुणे शहर आणि आगामी धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते संदीप रघुनाथरावजी मोहितेपाटील (sandipmohitepatil) यांच्या वतीने स्वागत कक्ष उभारण्यात आला होता. यावेळी आगामी धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज या अनेक भागात संपूर्ण जगभर असंख्य भाषेत लवकरच प्रदर्शीत होणाऱ्या बहुप्रतिक्षीत चित्रपटाच्या मुख्य पोस्टरचे प्रकाशन करण्यात आले आणि स्वराज्य रथ सोहळ्यातील ९५ स्वराज्य रथाचे प्रमुखांना स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची फ्रेम भेट देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी शिवनेरी फाऊंडेशन आणि ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ चित्रपटाचे सर्वेसर्वा संदीप मोहिते पाटील(sandipmohitepatil) यांच्यासह निर्माते शेखर मोहितेपाटील, सौजन्य निकम, धर्मेंद्र बोरा, केतनराजे भोसले, दिग्दर्शक तुषार विजयरावजी शेलार, पुणे शहराचे DCP मिलिंदजी मोहितेपाटील, गोरक्षक शिवशंकरजी स्वामी, सुप्रसिद्ध वास्तूतज्ञ आनंदजी पिंपळकर, कसबा मतदारसंघाचे आमदार रवींद्रजी धंगेकर, पुणे मनपा स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंतजी रासने, मनसेने नगरसेवक वसंतजी मोरे, पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष समीर बाबुरावजी चांदेरे उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles