आगामी येवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षाने सुरू केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात आले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit shaha) यांनी दोन दिवसाचा दौरा करीत राज्यातील विधानसभा मदरसंघाचा जागावाटपाबाबत महायुतीतील मित्र पक्षाशी चर्चा केली. दि. २५ सप्टेंबर बुधवारी मध्यरात्री बैठकीत जागावाटपाबाबत महत्त्वपूर्ण चर्चा संभाजीनगर या ठिकाणी झाली. या बैठकीनुसार यामध्ये भाजप 150 ते 160 जागा लढणार असल्याचे समजते.
भाजपचा 155 ते 160 जागांसाठी आग्रह आहे. विधानसभा निवडणुकीत अधिक जागांचा आग्रह धरण्यापेक्षा स्ट्राईकरेट कडे लक्ष देण्याचा सूचना भाजपचे जेष्ठ नेते अमित शहा (Amit shaha) यांनी भाजपसह महायुतीतील शिंदे गट आणि अजित पवार गटाला दिले आहेत. जागा वाटपाबाबत भाजपने 155 ते 160 जागांसाठी आग्रह धरला आहे. तर शिंदे गटाला 80 ते 85 आणि अजित पवार गटाला 55 ते 60 जागा सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महायुतीतील मुख्य तीन पक्षात जागावाटप होणारा असून छोट्या घटक पक्षांना आपापल्या कोट्यातून जागा सोडण्याचा निर्णय झाल्याचे समजते. अमित शहा यांच्याकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतला जात आहे. विदर्भ, मराठवाडा,पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राचा आढावा घेतल्यानंतर आता पुढील आठवड्यात मुंबई आणि कोकणातील जागावाटपा संदर्भात अमित शहा पुन्हा एकदा राज्यात येत आहेत. महायुतीचा जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला हा अजून ठरलेला नाही त्यामुळे अंतिम फॉर्मुल्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.