Wednesday, July 17, 2024

ठाकरेसरकार हे अंतर्विरोधामुळे पडेल, त्याकडे त्यांची वाटचाल सुरू आहे;देवेंद्र फडणवीस

- Advertisement -

तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस कोकणच्या दौऱ्यावर आहे. एबीपीमाझा वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. (The Thackeray government will fall due to internal contradictions, it is on its way – Devendra Fadnavis)

‘मी पंढरपूरच्या जनतेला शब्द दिला होता. या सरकारचा करेक्ट कार्यक्रम करेल. मी माझ्या विधानावर ठाम आहे. पण आता सध्या ही वेळ नाही. आपण कोरोनाशी लढत आहोत. आम्हाला कोरोनाशी (Corona) लढायचं आहे. या सरकारशी लढायचं नाही. ज्या दिवशी कोरोनाचा काळ संपेल तेव्हा मी माझा शब्द खरा करून दाखवेल’, असा विश्वास भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी व्यक्त केला. पंढरपूर पोटनिवडणुकीमध्ये अख्खी राष्ट्रवादी उतरली. संपूर्ण प्रशासनाचा गैरवापर करण्यात आला. पण जनतेनं आमच्या उमेदवाराला निवडणूक दिलं. मी पंढरपूरच्या जनतेला शब्द दिला होता, या सरकारचा करेक्ट कार्यक्रम करेल. मी माझ्या विधानावर ठाम आहे.

तर या सरकारला तोंड दाखवण्यासाठी जागा उरणार नाही

‘रश्मी शुक्ला यांचा जो अहवाल आहे, तो जर बाहेर आला तर या सरकारला तोंड दाखवण्यासाठी जागा उरणार नाही. त्यामुळे हे सरकार न्यायालयात गेले आहे आणि चौकशी करू नये, अशी विनंती करत आहे. हे सरकार त्यांच्याच अंतर्विरोधामुळे पडेल हे मी आधीच सांगितलं होतं. आता त्याची वेळ जवळ येत आहे. त्याकडे वाटचाल आता सरकारची सुरू झाली आहे, असा दावा फडणवीस यांनी केला.

मराठा आरक्षण

‘महाविकास आघाडी सरकार मराठा समाजाची फसवणूक करत आहे. राज्यपालांना भेटून एक पत्र देऊन काही होत नाही. एका पानाचे निवेदन दिले आहे, त्यामुळे असा काही फरक पडत नाही. मराठा समाजाची फसवणूक आहे. उलट मोदींनी मराठा आरक्षण द्यावे, अशी मागणी करत आहे. हे अत्यंत चुकीचे आहे. या सरकारकडे कोणताच प्रस्ताव नाही. आपल्या अंगावर आलेले काम झटकण्याचा प्रयत्न आहे. असा टोलाही फडणवीस यांनी ठाकरे सरकारला लगावला.

मराठा आरक्षणाचा कायदा हा आम्ही आणला होता. उच्च न्यायालयात हा विषय गेला होता पण न्यायालयाने स्थगिती देण्यास नकार दिला. महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर पुन्हा हा निर्णय न्यायालयात गेला आणि त्याला स्थगिती मिळाली आणि आता तो रद्द झाला. या सरकारला मराठा आरक्षणाबद्दल कोणतेही गांभीर्य नाही. अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेव्यतिरिक्त कोणतेही काम केले नाही,अशी टीकाही फडणवीस यांनी केली. (The Thackeray government will fall due to internal contradictions, it is on its way – Devendra Fadnavis)

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles