10 MLAs who are elected with the largest margin of votes: बहुचर्चित असणारी 2024 ची विधानसभा निवडणूक पार पडली. महायुतीला पूर्ण बहुमत मिळालं यामध्ये सर्वाधिक मत फरकाने निवडून आलेल्या 10 उमेदवारांचा विचार केला तर ते उमेदवार पुढील प्रमाणे आहेत.
1.महाराष्ट्रात सर्वाधिक मतपर्काने निवडून आलेले उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टीचे शिरपूर मतदारसंघाचे काशीराम पावर (Kashiram Pawar) यांना तब्बल 1 लाख 45 हजार 944 मतांनी विजय मिळाला. त्यांनी अपक्ष उमेदवार जितेंद्र ठाकूर यांचा पराभव केला.
2. महाराष्ट्रात दोन नंबर मत फरकाने निवडून आलेले उमेदवार ही भारतीय जनता पार्टीचे सातारा मतदारसंघातील शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhosale) हे आहेत. शिवेंद्र राजे यांना 1 लाख 42 हजार 124 एवढ्या मताधिक्याने विजयी झाले. त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचे उमेदवार अमित कदम यांना पराभूत केले.
3. तीन नंबर मताधिक्य मिळाले ती विधानसभा म्हणजे बहुचर्चित असणारी परळी विधानसभा मतदारसंघ धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना परळी विधानसभा मतदारसंघातून तब्बल 1 लाख 41 हजार 241 एवढे मताधिक्य मिळाले. त्यांच्या विरोधात शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेसाहेब देशमुख हे पराभूत झाले.
4. भारतीय जनता पार्टीचे बागलान विधानसभा मतदारसंघातील उमेदवार दिलीप बोरसे (Dilip Borase) यांना 1 लाख 29 हजार 297 एवढे मताधिक्य मिळाले यामुळे ते महाराष्ट्रात सर्वाधिक मतपर्काने निवडून येणार यांच्या यादी चार नंबरला येतात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या दीपिका चव्हाण यांचा पराभव केला.
5. सर्वाधिक मतफरखाने निवडून येणाऱ्यांची यादीत पाच नंबरला नावे तर ते म्हणजे कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आशुतोष काळे (Aashutosh Kale) यांचे काळे यांचा 1 लाख 24 हजार 624 एवढा मताधिक्याने विजय झाला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे संदीप वरपे यांचा पराभव केला.
6. या यादीत सहा नंबर ला नाव येते ते म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांना तब्बल 1 लाख 20 हजार 717 एवढ्या मतांनी विजय झाला. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार केदार दिघे यांचा पराभव केला.
7. नागपूर पूर्व मतदारसंघातून भाजपची कृष्णा खोपडे (Krushna Khopade) यांना 1 लाख 63 हजार 930 एवढी मते अधिक मिळाली त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे धनेश्वर पेठे यांचा पराभव केला.
8. महाराष्ट्राचे माजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील (Chandrakant Patil) यांचा या यादीत 8 वा क्रमांक लागतो त्यांनी 1 लाख 12 हजार 41 मतांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत मोकाटे यांचा पराभव केला.
9. मावळ मतदार संघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील आण्णा शेळके (Sunil Anna Shelke) यांचा 1 लाख 8 हजार 565 मत फरकाने विजय झाला त्यांनी अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांचा पराभव केला.
10. भारतीय जनता पार्टीचे मेळघाट मतदार संघातील उमेदवार केवलराम काळे (Kevalram Kale) हे 1 लाख 6 हजार 859 च्या अधिकच्या मतांनी निवडून आले आहेत. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार हेमंत चिमोटे यांचा पराभव केला.