Rajaram Election Candidate|हे उमेदवार सत्ताधारी महाडिक गटाकडून रिंगणात उतरले आहेत. महाडिक गटाचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक हे स्वत: संस्था गटातून निवडणूक लढवत आहेत. या कारखान्यावर महादेवराव महाडिक यांची सलग २८ वर्षे निर्विवाद सत्ता राहिली आहे.
उत्पादक गट क्रमांक १ मधून
1) विजय वसंत भोसले
2) संजय बाळगोंडा मगदूम
उत्पादक गट क्रमांक २ मधून
1) शिवाजी रामा पाटील
2) सर्जेराव बाबुराव भंडारे
3) अमल महादेवराव महाडिक
उत्पादक गट क्रमांक ३मधून
1) विलास यशवंत जाधव
2) डॉ.मारुती भाऊसो किडगावकर
3) सर्जेराव कृष्णात पाटील (बोणे)
उत्पादक गट क्रमांक ४ मधून
1) तानाजी कृष्णात पाटील
2) दिलीपराव भगवान पाटील 3)मीनाक्षी भास्कर पाटील
उत्पादक गट क्रमांक ५ मधून
1)दिलीप यशवंत उलपे
2)नारायण बाळकृष्ण चव्हाण
उत्पादक गट क्रमांक ६ मधून
1) गोविंद दादू चौगले
2) विश्वास सदाशिव बिडकर
महिला राखीव गटातून
1) कल्पना भगवानराव पाटील
2)वैष्णवी राजेश नाईक
इतर मागास प्रतिनिधी गटातून
1)संतोष बाबुराव पाटील
अनुसूचित जाती जमाती गटातून
1) नंदकुमार बाबुराव भोपळे
भटक्या विमुक्त जाती जमाती गटातून
1) सुरेश देवाप्पा तानगे
संस्था गटातून
1) महादेवराव रामचंद्र महाडिक
माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. गेली अठ्ठावीस वर्षे कारखाना ज्या विश्वासाने सभासदांनी आमच्या हाती सोपवला, त्याच विश्वासाने यंदाही कारखान्याचे सुज्ञ सभासद आम्हाला सेवेची संधी देतील. विरोधकांनी कितीही प्रयत्न केला तरी राजाराम कारखाना त्यांना बळकावता येणार नाही. असे उद्गार महाडिक यांनी काढले.
सत्तारूढ सहकार आघाडीचे नेते अमल महाडिक यांनी बोलताना सर्वसमावेशक उमेदवारांचे तगडे पॅनेल आम्ही जाहीर केले असून, विजयाच्या दिशेने आम्ही पहिले पाऊल टाकल्याचे सांगितले. सर्वसामान्य शेतकरी सभासद आमच्या पॅनेलला भरघोस मतांनी विजयी करतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. खासदार धनंजय महाडिक यांनी माघार घेतलेल्या उमेदवारांचे आभार मानले तसेच सर्व उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.
- IND vs AUS | India vs Australia WTC Final 2023 LIVE
- विद्यार्थी पटसंखेनुसार संच मान्यता करून एकाच टप्प्यात 100% शिक्षकांची पदभरती करा
- चला समजून घेऊया सर्वंकष ग्रामविकास आराखडा…|rural development plan
- PMMVY | प्रधानमंत्री मातृवंदना योजना नव्या स्वरूपात लागू
- मोठी बातमी | शिक्षण विभागात मोठा भ्रष्टाचार, आयुक्तांचे एसीबीला पत्र