खतांच्या किमती वाढवल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी उद्या आंदोलन पुकारलेले होते. जुन्या दराने शेतकर्यांना खत मिळाले पाहिजे यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलनाच्या तयारीत होती. पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उद्याचे आंदोलन स्थगित केले गेले आहे. (This is a great victory for the unity of the farmers Tomorrow’s agitation postponed – Raju Shetty)
मोठी बातमी | DAP वर आता 500 नव्हे, तर थेट 1200 रुपयांचे अनुदान मिळणार
मोदी सरकारच्या या ऐतिहासिक निर्णयानुसार डीएपी खतासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानाची रक्कम प्रत्येक बॅगेमागे 500 रुपयांवरून थेट 140 टक्क्यांनी वाढून 1200 रुपयांपर्यंत करण्यात आलीय. अशा प्रकारे DAP च्या आंतरराष्ट्रीय बाजारभावांमध्ये वाढ झाली असली तरी ती केवळ 1200 रुपयांच्या जुन्या दराने देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तसेच केंद्र सरकारनेही दरवाढीचा संपूर्ण भार सोसावा, असा निर्णय घेतलाय. आतापर्यंत प्रति बॅग अनुदानाचे प्रमाण एकाच वेळी कधीही वाढविण्यात आले नाही. मागील वर्षी डीएपीची वास्तविक किंमत प्रति बॅग 1,700 रुपये होती.
ज्यामध्ये केंद्र सरकार प्रति बॅग 500 रुपये अनुदान देत होती. त्यामुळे कंपन्या शेतकऱ्यांना प्रति बॅग 1200 रुपये दराने खत विक्री करीत होत्या. नुकत्याच DAP मध्ये वापरल्या जाणार्या फॉस्फोरिक अॅसिड, अमोनिया इत्यादी आंतरराष्ट्रीय किमती 60% वरून 70% पर्यंत वाढल्यात. या कारणास्तव डीएपी बॅगची वास्तविक किंमत आता 2400 रुपये आहे, जे खत कंपन्या 500 रुपयांच्या अनुदानावर 1900 रुपयांना विकतात. आजच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना फक्त 1200 रुपयांमध्ये डीएपी खताच्या पिशव्या मिळतील.This is a great victory for the unity of the farmers Tomorrow’s agitation postponed – Raju Shetty