हीच ती वेळ ; महाराष्ट्रात “भगव्या” च राज्य येते आहे -नितेश राणेंचे खळबळजनक ट्विट

1 5

- Advertisement -

राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्यानं राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा केल्या जात आहे. सत्तांतराबद्दलचे तर्कवितर्क लावले जात असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या वैयक्तिक भेटीबद्दलही चर्चा होत आहे. या राजकीय चर्चांना होत असतानाच आज शिवसेनेचे प्रवक्ते आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेलं पत्र समोर आलं आहे. नरेंद्र मोदी आणि भाजपाशी जुळवून घेण्याची विनंती आज सरनाईक यांनी केली आहे. या पत्रानंतर आता भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी खळबळ उडवून देणारं ट्विट केलं आहे. (This is the time; Maharashtra is a saffron state – Nitesh Rane’s sensational tweet)

https://twitter.com/NiteshNRane/status/1406520271385894912?s=20

प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन पानी पत्रं लिहून आघाडीतील मित्र पक्षांवरच तोफ डागली आहे. 10 जून रोजी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्रं लिहिलं आहे. सत्तेत असलेले राष्ट्रवादी-काँग्रेस आपलेच कार्यकर्ते फोडत आहेत. आपला पक्ष कमकुवत होत असेल तर मोदींशी जुळवून घेतलेले बरे. त्यामुळे सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या सहकाऱ्यांना होत असेलला नाहक त्रास तरी थांबेल, असा दावा सरनाईक यांनी केला आहे. तसेच युती तुटली तरी युतीच्या नेत्यांचे वैयक्तिक संबंध, जिव्हाळा अनेक नेत्यांमध्ये तसाच आहे. ते अजून तूटण्याआधी परत जुळवून घेतलेलं बरं होईल, असं त्यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्यातील विविध विषय निकाली काढण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पंतप्रधानांशी चर्चा केली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात वैयक्तिक बैठक झाली. या बैठकीवरून बरेच तर्कविर्तक लावले जात आहे. शिवसेना-भाजपा पुन्हा एकत्र येणार असल्याचीही भाकितंही केली जात आहे.

त्यातच आता प्रताप सरनाईक यांनी दिलेली युतीची हाक आणि भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेच्या निवडणूक जाहीरनाम्याचं ब्रीद वाक्य असलेल्या ‘हीच ती वेळ’चा उल्लेख करत सत्तांतराचे दिलेले संकेत, यामुळे राज्यात पुन्हा एकदा युतीचं सरकार येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.