Friday, March 17, 2023
No menu items!
Homeमहाराष्ट्र‘गाढवांचा’ भार उचलायला, ‘बैलांचा नकार’ ; भाई जगतापांना प्रसाद लाड यांचा टोला

‘गाढवांचा’ भार उचलायला, ‘बैलांचा नकार’ ; भाई जगतापांना प्रसाद लाड यांचा टोला

गेले काही दिवस इंधन दरवाढीवरून काँग्रेस पक्ष सध्या राज्यातील विविध ठिकाणी आंदोलन करत आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्वात आज मुंबईत हे आंदोलन पार पडले. यावेळी पेट्रोल, डिझेलच्या निषेधार्थ बैलगाडीवरून मोर्चा काढण्यात आला होता. मात्र आंदोलनादरम्यान बैलगाडी तुटली व काँग्रेस कार्यकर्त्यांसह भाई जगताप खाली पडले. सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून भाजप प्रदेश उपाध्यक्ष आणि आमदार प्रसाद लाड यांनी ट्वीट करत जगताप यांना खोचक टोला लगावला आहे. To lift the load of ‘donkeys’, ‘rejection of bulls’; Tola of Prasad Lad to Bhai Jagtapan

इंधन दरवाढी विरोधात हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. मात्र एकाच वेळी या बैलगाडीवर अनेक कार्यकर्ते उभे होते. काही वेळातच बैलगाडीचा भाग वेगळा होऊन तुटला आणि बैलगाडीत उभे असलेले कार्यकर्ते खाली पडले. “गाढवांचा’ भार उचलायला, ‘बैलांचा नकार! भाई जगताप तुम्हाला सांगू इच्छितो की, “माणसाने झेपेल तेवढंच करावं! असे पब्लिसिटी स्टंट करताना, त्या मुक्या जीवांचा विचार करावा!” अशी टीका आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे. अशा प्रकारचे स्टंट करून आणि मुक्या जनावरांना इजा पोहोचवून काँग्रेसला काय साध्य करायचं आहे? असा सवाल देखील प्रसाद लाड यांनी केला आहे.

 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular