पुण्यात पोलीस आणि स्थानिकांमध्ये तुफान राडा; नागरिकांकडून आत्मदहनाचा प्रयत्न

Live Janmat

आज सकाळ पासून पुण्यातील आंबिल ओढ्याचा वाद पेटला आहे. बिल्डरच्या फायद्यासाठी आंबिल ओढ्याचा नैसर्गिक प्रवास बदलण्याचा घाट घालण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप आहे. यामुळे आंबिल ओढ्यालगत असलेल्या घरे पाडण्याच्या कारवाईला सुरुवात करण्यात आली. या कारवाईला नागरिकांचा कडाडून विरोध पाहायला मिळत आहे. यावेळी अनेकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. (Tufan Radha among police and locals in Pune; Attempted self-immolation by citizens)

आंबिल लोढा परिसरातील अतिक्रमण हटवण्यासाठी पुणे पोलिसांसह पालिका अधिकारी पोहोचले होते. मात्र यावेळी स्थानिकांनी अतिक्रमण हटवण्यास विरोध केलं. यावेळी ‘पुणे पोलीस मुर्दाबाद’ अशा घोषणादेखील देण्यात आल्या. काही नागरिकांनी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्याने येथे तणाव निर्माण झाला आहे.

मी पुण्याचा माजी महापौर आहे, महापौर जे निर्णय घेतात, ते प्रशासन ऐकतं, त्यामुळे राज्य सरकार किंवा प्रशासनाला दोष न देता, भाजपने हात झटकू नये, आम्ही प्रशासन चालवलं आहे, सत्ताधाऱ्यांना विचारात घेतल्याशिवाय प्रशासनन कारवाई करत नाही, असा दावा राष्ट्रवादीचे पुणे अध्यक्ष आणि माजी महापौर प्रशांत जगताप यांच्याकडून केला जात आहे. पावासाळ्यात अशी कारवाई करायची नाही हे बैठकीत ठरलं होतं, पण ही कारवाई का केली असा प्रश्न प्रशासनाला विचारण्यात आला, पण त्यांच्याकडे उत्तर नाही. त्यामागचं कारण शोधावं लागेल, जर सत्ताधारी भाजपने पावसाळ्यात कारवाई करु नये असं ठरवलं होतं, तरीही ही कारवाई का झाली, राज्य सरकारशी चर्चा करुन प्रशासनावर कारवाई करण्याबाबत विचारणा करु, असं भाजप आमदार आणि माजी महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here